▪️महाविद्यालय आपल्या दारी ; विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.18मार्च):- भारतीय महाविद्यालय मोर्शीच्या वतीने शिक्षण सर्वांसाठी आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी “महाविद्यालय आपल्या दारी” हा उपक्रम माननीय प्राचार्य डॉ. संतोष आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दुरस्थ व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाविद्यालय करीत आहे.
या उपक्रमां अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा, उपस्थित राहण्यासंदर्भात मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना येत असणाऱ्या अडचणी, व समस्या, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 ची प्रभावी अंमलबजावणी, पालक व महाविद्यालय समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या अंतर्गत विद्यार्थांना महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती त्यांच्याच गावात दिली जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, आणि वित्तीय सह्हाय या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. महाविद्यालयातील ग्रंथालय सुविधा, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन सुविधा, इत्यादी अनेक बाबी संदर्भात मार्गदर्शन केल्या जाणार आहे.
हा उपक्रम विशेषता ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. तसेच आमचे तज्ञ प्राध्यापक, कर्मचारी व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य शिक्षणाची संधी मिळावी यासाठी सहकार्य करणारा आहेत. असा विश्वास माननीय प्राचार्य डॉ. संतोष आगरकर यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाच्या आयोजनामध्ये डॉ. सुरेश बिजवे, डॉ संदीप राऊत, डॉ. रजनीश बांबोळे, डॉ. भगवान साबळे, डॉ. सावन देशमुख, प्रा. दीपक काळे, प्रा गोपाल भलावी, प्रा अरविंद पाझरे, डॉ. लाजवंती टेम्भूर्णें, डॉ. शिरीष टोपरे व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.