Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात सीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा महाविद्यालयात सीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

69

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.27मार्च):-येथे आज दि. २७ मार्च २०२६ रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील  पदव्युत्तर वाणिज्य विभाग व संशोधन केंद्रातर्फे सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

     या सत्कार समारंभाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. के एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए.वाघ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर देवरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक व्ही. एन. बोरसे, तसेच वाणिज्य विभागातील सहा. प्रा. प्रवीण इंदरचंद जैन, कनिष्ठ विभागातील सहाय्यक शिक्षक  डी.डी.करणकाळ इत्यादी उपस्थित होते.

    या सदर कार्यक्रमाप्रसंगी सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण चेतन सुनील जैन व रोहन दीपक जैन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दीप सुहास शहा व चहक सुहास अग्रवाल हे दोन विद्यार्थी सीएआयपीसीसी परीक्षा उत्तीर्ण झाले तसेच भाग्यश्री प्रल्हाद कुमावत या विद्यार्थिनीने सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाली त्याबद्दल या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा  देखील  उपस्थित मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार  कार्यक्रमाप्रसंगी पालकांपैकी श्री. दीपक धरमचंद राखेचा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करत राहते व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तसेच विद्यार्थ्यांच्या विविध यशाचे कौतुक महाविद्यालयातर्फे नेहमीच होते’.   

  यावेळी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात व प्रयत्न केले जातात, त्याबद्दल त्यांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार मानले.

  या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  ॲड.संदीप सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षकांनी नेहमी  विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे.

महाविद्यालयाचे भविष्यातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी नवीन टेक्नॉलॉजीचा अंगीकार करावा व स्मार्ट वर्क वर लक्ष केंद्रित करावे व त्यानुसार आपले करिअर निवडावे.या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी वाणिज्य विभागाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आय. जैन यांनी केले.