

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा अजून स्वीकृत झाला नाही म्हणून सर्व शासकिय कार्यालयांना POSH नियमावली अंमलबजावणीबाबत आदेश त्या काढत आहेत.
इतके दिवस रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्षपदावर असताना असे आदेश काढायला त्यांना वेळ मिळाला नसेल किंवा आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी झालेली नसेल.
प्रायव्हेट आयटी कंपन्यांत POSH ट्रेनिंग झाल्याशिवाय ONBOARDING केली जात नाही.आणि अनेक कंपन्यांत वार्षिक POSH ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे.
तसेच एवढा मोठा मॅटर झालेला आहे पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चाकणकर यांचा राजीनामा घ्यायला वेळ नाहीये का? असा प्रश्न पडतोय. त्याचबरोबर त्यांना नरहरी झिरवळ यांचाही राजीनामा घ्यावा लागणार आहे.आणि तो नाही घेतला तर उद्या मंत्र्यांचे असेच व्हिडिओ व्हायरल होत राहिले तर XHamster वगैरे वेबसाईटला महाराष्ट्र कॅबिनेट अशी वेगळी कॅटेगरी लाँच करावी लागेल.आणि तरीही देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेता येणार नाही.
विषय नरहरी झिरवळ यांचा व्यक्तिगत असेल पण जागा सरकारी वापरली आहे.त्यांचा जो कार्यक्रम झाला आहे तो शासकिय विश्रामगृहात झालेला आहे असे चर्चेत येत आहे.
मागे मराठवाड्यात जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी गावखेड्यात इतका दुष्काळ असताना शासकिय विश्रामगृहातील हिरवळ टिकून कशी काय आहे? असा प्रश्न राज ठाकरेंनी सरकारला विचारला होता.
साध्या साध्या तालुक्यातील सरकारी विश्रामगृहे टापटीप असतात.त्यात स्थानिक आमदार किंवा मंत्र्यासाठी सुसज्ज असा डायमंड सुईट रेडी असतो.तिथं सरकारी अधिकाऱ्यांनाही प्रवेश मिळत नाही.अशा विश्रामगृहांवर करोडो रुपये उधळले जातात.पण ज्या लोकांच्या करांतून हि विश्रामगृहे बांधली जातात त्यांना हे वापरण्याची मुभा नसते.
आमच्या परळीसारख्या भकास तालुक्यात टोलेजंग विश्रामगृह बांधून तयार झाले आहे.तसेच परळी थर्मल पॉवरस्टेशनचे एक विश्रामगृह आधीच तयार आहे.त्याचीही हिरवळ टिकवून ठेवलेली आहे.बाकी शहरात धुळीचे लोट, जागोजागी गटारे, रस्त्यांत फळविक्रेत्यांचे गाडे आणि नदीएवढे उघडे मोठे नाले असतील तरी विश्रामगृह मात्र टकाटक असून ते परळीतील मुख्य रस्त्यावर बांधण्यात आलेले आहे.आता त्याचा किती वापर जनहितासाठी होतो हे बघण्याचे औत्सुक्याचे ठरेल.
बाकी झिरवळ यांचा राजीनामा स्वतः सुनेत्रा पवार घेतील की पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना तंबी देऊन राजीनामा घ्यावा लागेल हे महाराष्ट्र बघतच राहिल. बिगारी कामगार ते कॅबिनेट मंत्री झालेले झिरवळ याआधीही मंत्रालयात त्यांच्या OSD ने लाच घेताना अडचणीत आले होते पण तेव्हा त्यांचं मंत्रीपद वाचलं.आता मात्र स्वतः झिरवळ व्हिडिओत परस्त्रीशय्या करताना दिसत आहेत त्यामुळे सरकारला हे स्कँडल दाबताही येणार नाही.
मिटकरीसारखा बाजारू या विषयांत ७ महिन्यापूर्वीचा व्हिडिओ म्हणत झिरवळची पाठराखण करत आहे म्हणजे जी गोष्ट आता सामान्य लोकांपर्यंत आली आहे ती आधीच राजकारण्यांच्या मोबाईलमध्ये आली होती. झिरवळ यांनी हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून प्रयत्नही केले असतील.पण व्हिडिओ रोखणे आजकाल अशक्यप्रतीची गोष्ट झालेली आहे.भविष्यात सगळे राजकारणी मिळून असे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत म्हणून कडक कायदा आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.







