Home महाराष्ट्र बाराशे वर्षाचा खरा इतिहास जगासमोर आणावा लागेल -डॉ.भीमराव य आंबेडकर

बाराशे वर्षाचा खरा इतिहास जगासमोर आणावा लागेल -डॉ.भीमराव य आंबेडकर

158

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(चैत्यभूमी)(दि.29मार्च):-सम्राट अशोक यांचे प्रशासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आणले असून सम्राट अशोक हे मौर्य होते, या मौर्यांचा 1200 वर्षाचा खरा इतिहास जगासमोर आणावा लागेल आणि सम्राट अशोक यांची जयंती दरवर्षी मोठ्या थाटात संपूर्ण देशात साजरी झाली पाहिजे, भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्या प्रतिमा/मूर्ती बौद्ध विधी संस्कार मध्ये लावाव्यात असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) मुंबई प्रदेश यांच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती समारोह अशोक स्तंभ समोर, तोरणा गेट प्रवेशद्वार,चैत्यभूमी, दादर पश्चिम मुंबई येथे सांगितले.त्रिसरण पंचशील व आशीर्वाद भंते बी सुमेधबोधी (चैत्यभूमी) यांनी दिले .         

                                              प्रमुख वक्ते म्हणून सम्राट अशोक यांचे वंशज असलेले ॲड. प्रकाश मौर्य (राष्ट्रीय संघटक) यांनी अखंड भारतात भगवान बुद्धाचा धम्म सम्राट अशोक यांनी कसा वाढविला व आपले राज्य कसे चालविले, बौद्ध धम्म संपविण्यासाठी विरोधकांनी काय षड्यंत्र केले याचे विवेचन करून आता मौर्य समाज एकवटला असून पुन्हा देश बौद्धमय करायचा आहे असे सांगितले. तसेच आयु सुभाचन राम (चिफ कमिशनर इनकम टॅक्स Rtd IRS) यांनी, सम्राट अशोक हे कसे अर्थशास्त्री होते, जनतेला प्रजा ऐवजी नागरिक म्हणण्याची प्रक्रिया सुरू केली व बुद्ध काळात भारतातील सर्वजन बौद्ध होते असे सांगितले. 

            ॲड एस. के. भंडारे (ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख) यांनी , तथागत बुद्ध , सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील साम्य असे सांगितले की, तथागत बुद्ध यांनी परिवारापेक्षा सर्व मानवाचा विचार केला, सम्राट अशोक यांनी बुद्धाच्या धम्मासाठी स्वतःने जनतेचा विचार केला त्यांनी त्यांची दोन्ही मुले (महामहेंद्र व संघमित्रा) धम्मासाठी दान दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मुलांच्या व कुटुंबाच्या विचार पेक्षा समाजाचा विचार केला, आज असलेली संसद, विधान सभा याची बैठक व्यवस्था, सभापती व अध्यक्ष समोरचा दंडक, त्यांच्या आसनाच्या पाठीमागे धर्मचक्र प्रवर्तनाय, सत्य मेव जयते, बहुजन हिताय, चार, सिंह मुद्रा हे सर्व गोष्टी तथागत बुद्ध व सम्राट अशोक यांच्या काळातील आहेत. संस्थेच्यावतीने सम्राट अशोक यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणार असून जे चुकले आहेत त्यांनी पुन्हा बौद्ध धम्मात घरवापासी करावी असे आवाहन केले. 

        यावेळी मंचकावर सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्षा व केंद्रीय महिला विभाग प्रमुख) भिकाजी कांबळे (राष्ट्रीय सचिव) होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विलास वानखडे (अध्यक्ष,मुंबई प्रदेश) होते. प्रास्ताविक,सूत्रसंचालन प्रदिप कांबळे (उपाध्यक्ष ,मुंबई प्रदेश व व्यवस्थापक, चैत्यभूमी) यांनी केले . या वेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली. या सम्राट अशोक यांच्या जयंती कार्यक्रमास मुंबई प्रदेश (पुरुष/ महिला) आणि मुंबई प्रदेश अंतर्गत सहा झोन शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.