

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.29मार्च):-तालुक्यातील राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाद्वारे बीए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कै सौ शेषाबाई मुंढे महाविद्यालय, गंगाखेड येथील इंग्रजी विभाग प्रमुख, प्रा डॉ राजीव आहेरकर हे होते. आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा डॉ आहेरकर म्हणाले की, हे युग स्पर्धेचे युग आहे आणि विद्यार्थ्यांना जर स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखावी त्यानुसार वेळेचे नियोजन करून यशासाठी सातत्याने प्रयत्न करावे.
नियोजन आणि सातत्य हे यशाची गुरुकिल्ली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रेणुकादास बोन्नर हे होते. अध्यक्षिय समारोप करताना प्राचार्य बोन्नर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य गुणांचा विकार करावा आणि या स्पर्धेच्या युगात स्ववलंबी बनावे. इंग्रजी विभाग प्रमुख, प्रा डॉ तुकाराम बोबडे, तसेच प्रा सूर्यकांत फुटके हे या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमातून आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी भावुक झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सूर्यकांत फुटके यांनी केले तर प्रा.डॉ.तुकाराम बोबडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.







