राज्यात पहिली आलेली “रूंजी” हिचा शहरात पहिला सत्कार

85

▪️व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडीया व फ्रिडमचा पुढाकार 

✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

साकोली(दि.10एप्रिल):-अख्ख्या महाराष्ट्र राज्यात भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत साकोलीतील जिल्हा परिषद शाळेची दूसरीची विद्यार्थीनी रूंजी संग्रामे हीने प्रथम क्रमांक पटकाविला. व आता राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यात पाचवी आली. ही साकोलीसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. करीता तीचा शहरात पहिला सत्कार येथील व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडीया नेटवर्क व फ्रिडम युथ फाऊंडेशन कडून शाळेत बुधवार ( ०९ एप्रिल ) ला भेटवस्तू देऊन केला. प्रसंगी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. 

 रूंजी सुधाकर संग्रामे जि. प. प्राथ. शाळा क्र. २ पंचशील वार्डची विद्यार्थीनी जाने.२०२५ च्या भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत २०० पैकी २०० गुण घेत राज्यात प्रथम आली. तसेच राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतही १५० पैकी १४२ गुण घेत महाराष्ट्रात पाचवी आली. करीता शहरातील अग्रगण्य व्हीआयपी समुहाचे अध्यक्ष अनिल कापगते, सदस्य ॲड. मनिष कापगते, साकोली मिडीयाचे आशिष चेडगे, फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांकडून रूंजी संग्रामे हीचा शालेय भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन साकोली शहरात हा रूंजी संग्रामे हिचा पहिला सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, से.नि. शिक्षक डी. जी. रंगारी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगराज मुंगमोडे, रूंजीची आई ललिता संग्रामे, शिक्षकवृंद पल्लवी लुथडे, पी. एस. देशपांडे, आशा वलथरे, लता इळपाते हे उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक डी. ए. थाटे यांनी सांगितले की, आज रूंजी संग्रामे हीच्या यशाबद्दल पहिली दखल घेऊन हे वृत्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केले ते म्हणजे साकोली मिडीया, व्हीआयपी समुह व फ्रिडम युथ मिडियाचे जिल्हा परिषद शाळा वतीने विशेष आभार मानतो असे प्रतिपादन केले. या शहरातील पहिल्या सत्कार समारंभात संचालन शिक्षक उमेश भस्मे यांनी केले तर आभार सौ. लुथडे यांनी मानले.