Home महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संयोगीताराजे छत्रपती यांची नियुक्ती करावी;महाराष्ट्रभरातून मागणी जोर धरते

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संयोगीताराजे छत्रपती यांची नियुक्ती करावी;महाराष्ट्रभरातून मागणी जोर धरते

197

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.1एप्रिल):-महाराष्ट्रातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विदर्भ निमंत्रक अनिल पाटील यांच्यासह अनेक शिवभक्त आणि विविध स्तरांतील नागरिकांनी ही मागणी पुढे रेटली आहे.

न्याय आणि स्त्रीसक्षमीकरणासाठी ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून युवराज्ञी संयोगीताराजे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्या संभाजीराजे छत्रपती यांच्या धर्मपत्नी असून, छत्रपती घराण्याच्या परंपरेतून आलेल्या संस्कारांचा ठसा त्यांच्या कार्यातून दिसून येतो. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संवेदनशील आणि प्रभावी नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्वराज्य पक्षाचे राज्य सदस्य गोपाल भिसडे यांनीदेखील या मागणीला पाठिंबा देत, “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संयोगीताराजे छत्रपती यांची नियुक्ती ही संविधानिक पदाला न्याय देणारी ठरेल,” असे मत व्यक्त केले.

दरम्यान, रायगडावर दरवर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा या भव्य सोहळ्याचे त्यांनी केलेले नियोजन, तसेच गड-दुर्ग संवर्धन, स्वच्छता अभियान आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये महिलांचा वाढता सहभाग यामुळे त्यांचे नेतृत्व अधोरेखित झाले आहे. महिलांना नेतृत्वाच्या संधी देत “स्त्री-पुरुष समानतेचा” विचार त्यांनी कृतीतून सिद्ध केल्याचेही सांगितले जाते.

तसेच, कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे उल्लेखनीय कार्यही त्यांनी केले आहे.

राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ठाम, निर्भय आणि संवेदनशील नेतृत्वाची गरज व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत संयोगीताराजे छत्रपती यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, ही मागणी आता राजमाता राजमाता जिजाऊंचे वंशज मंगला भारत जाधव सृष्टी भारत जाधव रितू अनिल पाटील प्राची पाटील शारदा हलवणे मंगला जाधव साधना शिंदे कार्तिक पाटील शिवकन्या सृष्टी रवी पाटील संदीप लहाने वैभव शिंदे तुषार पारे प्रवीण हिवाळे सर्व व तसेच विदर्भातील महिला तरुण सामान्य जनतेची ठाम भूमिका बनत चालली आहे.