

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
धुळे(दि.2एप्रिल):-धुळे येथील प्रख्यात वकील अॅड. मोहन शांतीलाल भंडारी यांच्या वाढदिवस दि. २ एप्रिल २०२६ रोजी अनोख्या पध्दतीने व मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अॅड. भंडारी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. अॅड. मोहन भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी धुळे जिल्हा ग्रंथालय व धुळे युथ क्लब वाचन कट्टा यांना विविध क्षेत्रातील पुस्तकांची सप्रेम भेट देवून सामाजिक बांधिलकी जपली.
शहरातील व जिल्हयातील होतकरु विदयार्थ्यांना या पुस्तकांचा अतोनात फायदा होईल व नविन पिढीला याचा लाभ होईल व वर्षानुवर्षे ही पुस्तके विदयार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात भर घालतील व मार्गदर्शन करतील या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच त्यांच्या कार्यालयातील ज्युनियर वकील यांच्यातर्फे देखील पांझरा पोळ येथील गोशाळेत गायींसाठी चारा वाटप करण्यात आले व सावली वृध्द आश्रम येथे वृध्द बंधू भगिनींना जेवण व त्यांना दैनंदिन जीवनात लागणा-या जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.
संपुर्ण कार्य करण्यामागचा एकच उद्देश की मानवतेचे कल्याण व्हावे व समाजातील सर्व थरातील लोकांनी सुखी रहावे व माणसांनी माणुसकी जपावी व आपण समाजाचे काही देणे लागतो या जाणीवेतून हा वाढदिवस एक अभिनव पध्दतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी अॅड. चैतन्य भंडारी व अॅड. चार्मिश भंडारी यांनी व अॅड. भंडारी यांच्या कार्यालयातील ज्युनियर्स यांनी अशी भावना व्यक्त केली की सदरील संकल्पना ही समाजातील सर्वांनी वाढदिवसानिमित्त राबवावी.







