रा. तू महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

73

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3मे):-गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे १ मे ला 66 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा करण्यात आला. या वेळी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ दिपक यावले अध्यक्षस्थानी होते.

महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ प्रफुल्ल बनसोड यांच्या हस्ते ध्वजारोहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक समता पर्वाच्या विभागाचे समन्वयक वाणिज्य विभागप्रमुख डॉ हरेश गजभिये, डॉ प्रफुल राजुरवाडे, प्रा. राकेश कुमरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यकमाला महाविद्यालयांतील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यानी भरभरून प्रतिसाद दिला.