सामुदायिक विवाह सोहळा संपन्न 

25

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.22मे):-सामाजिक बांधिलकी जपत असलेली पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने आयोजित सामुदायिक विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी नऊ वधू वर विवाह बद्ध झाले.

श्री सेवागिरी महाराज मंदिराच्या प्रांगणात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. सर्व वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, ट्रस्टचे चेअरमन डॉ.सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ,सचिन देशमुख, गौरव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. विवाह सोहळ्यापूर्वी सकाळ पासून सेवागिरी मंदिराच्या आवारात ‘लगीनघाई’ दिसत होती. सकाळनंतर भोजनावळी सुरू झाल्या, सार्यकाळपर्यंत हजारो वन्हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला होता, विधिकार्याची स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था केली होती,

या सोहळ्याचा सर्व खर्च देवस्थान ट्रस्टने केला. वधू-वरांच्या कोणताही खर्च करावा लागला नाही. वधू-वराचा पोशाख, संसार उपयोगी साहित्य, बन्हाडी मंडळास भोजन, फोटो आदी खर्च देखील ट्रस्टने केला. दल्यान, ‘हंडा बंदी’ व ‘लेक वाचवा’ ची शपथ सर्वांना देण्यात आली.