

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.19मे):-अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना आणि महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता संघटना यांच्या निर्देशानुसार चिमूर तालुका केमिस्ट संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी चे निवेदन उपविभागीय अधिकारी चिमूर व ठाणेदार चिमूर यांना सोमवारी देण्यात आलेले आहे.
या निवेदनात ऑनलाईन औषध विक्री बंद करण्यात यावी, कार्पोरेट्स द्वारे अव्यवसायिक डिस्काउंट बंद करण्यात यावे, बनावट औषधी पासून देश वाचवण्यात यावा यासोबतच विविध मागण्यासाठी संघटनेच्या वतीने 20 मे ला संपूर्ण भारतभर मेडिकल बंद ठेवण्यात येत आहे.
यासोबतच मागील 18 तारखेपासून शासनाचा या निर्णयाचा निषेध म्हणून काळी फीत लावून औषधी निर्माता मेडिकल मध्ये काम करीत आहे. यासाठी प्रशासनाला व शासनाला जाग यावी व या मागण्या मान्य करण्यात यावा, यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.
निवेदन चिमूर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष अजय चौधरी, सचिव स्नेहदीप खोब्रागडे यांचे नेतृत्वात निवेदन चिमूर उपविभागीय अधिकारी, ठाणेदार चिमूर तहसीलदार चिमूर व तालुका वैद्यकीय अधिकारी चिमूर यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी चिमूर तालुक्यातील नेरी, भिसी, शंकरपूर, खडसंगी, जांभूळघाट व इतर गावातील औषधी निर्माता उपस्थित होते.







