Home महाराष्ट्र कोण म्हणतो “नमो उद्यान” साठी जागा नाही.! ही घ्या जागा 

कोण म्हणतो “नमो उद्यान” साठी जागा नाही.! ही घ्या जागा 

164

▪️१ करोड रुपयाच्या बगीच्यावर नागरिक संतप्त 

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)

साकोली(दि.10मे):-ज्या जागेवर आधीच करोडो रुपये खर्च करून बगीचा तयार करण्यात आला त्याच ठिकाणी पुन्हा १ करोड रुपये गुंतवून बगीचा तयार करीत असल्याचे दाखविणे हा मूर्खपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांसमोर येत आहे. ज्या जागेवर आधीच करोडो रुपयाचे उद्यान आहे. त्याच जागेवर १ करोड रुपयाचा बगीचा तयार करून दाखविणे आणि त्याकरिता अपवाद १ नगरसेवक वगळता बहुमताने ठराव घ्यावा यावर सेंदूरवाफा-साकोली नागरिकांनी संतापासह आश्चर्य व्यक्त केले आहे.    

           सध्या नगर परिषदेसाठी नमो उद्यान स्पर्धा ठेवण्यात आली आहे. उत्कृष्ट उद्यानाला पुरस्कार प्राप्त होणार आहे. याकरिता या बगीच्याची निवड करण्यात आली. परंतु जिथे १ करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे ते कोणत्या जागेवर ? किती क्षेत्रफळात ? आणि त्याचे काय नियोजन आहे याची कुठलीही माहिती नागरिकांना नाही. साकोलीत बगीच्यासाठी जागाच नाही असे भासवून काही नगरसेवकांनी वैयक्तिक निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. साकोली – लाखांदूर रोडवर शांता कॉलनी परिसरात भव्य दिव्य जागा आहे.

या जागेवर प्रभाग १० मधील नगरसेवक सपन कापगते आणि माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी या जागेकडे नगर परिषदेचे लक्ष वेधले. नगरपरिषद प्रशासनाला नमो उद्यान स्पर्धेत उतरायचेच असेल तर नव्या जागेवर बगीचा तयार करावा आणि तिथे पैसे गुंतवावेत. अशी मागणी आता नागरिकांकडून “सामाजिक प्रसारमाध्यमांवर” जोर धरत आहे. घनकचरा परिसरात उद्यानाच्या नावावर पैसे घशात टाकल्याचा प्रकार जर लक्षात आला तर जनता नगरसेवकांना सोडणार नाही.

त्यामुळे साकोली आणि सेंदूरवाफा नगरपरिषदने यापुढे कुठलाही निर्णय घेतांना नगरसेवकांनी जबाबदारीने आणि स्वतःची विवेकबुद्धी शाबूत ठेवून निर्णय अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. आणि सर्व कामे जनतेला माहिती करूनच करा कोणताही छुपा व्यवहार करीत आता तरी “२०१७ लुटमार बंटाधार भ्रष्टाचार” खपवून घेतले जाणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया सोशल मिडीयातून व्यक्त केली जात आहे.