Home महाराष्ट्र टॅक्स घेतला ३० हजार अनं शौचास बसविले रोडावर 

टॅक्स घेतला ३० हजार अनं शौचास बसविले रोडावर 

30

▪️साकोलीत संतप्त प्रकार प्रतिष्ठीत डॉक्टरांनी आणला उघडकीस 

✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

साकोली(दि.24मे):-शीर्षक वाचून आश्चर्य वाटले.? होय हिच स्थिती आज साकोलीत आहे. मध्यवर्ती परेड मैदानावर मिना बाजार कडून नगरपरिषदेने ३० दिवसांचा चक्क ३० हजार कर घेतला. पण त्या लोकांना शौचास बसविले चक्क रस्त्यावर. हा संतप्त प्रकार तेथील एका प्रतिष्ठीत डॉक्टरांनी ( शनि. २३ मे ) ला उघडकीस आणला व “युवाराष्ट्र दर्शन” प्रतिनिधीला फोन करून सांगितले की, हा संतापजनक प्रकार तात्काळ प्रशासनाच्या लक्षात आणून द्या व त्वरीत रोडवरून असे पहाटे घाणीचे साम्राज्यावर पायबंदी करावी. 

              सविस्तर की, शहरातील होमगार्ड परेड मैदानावर सध्या जनतेच्या मनोरंजनासाठी मिना बाजार विविध झोपाळे आले आहेत. नगरपरिषदेने या मालकांकडून ३० दिवसांचे ३० हजार रुपये घेऊन पावती दिली आहे. पण दररोज येथील महिला पुरुष व लहान मुले लोटा घेऊन चक्क तलावाच्या रोडवर व तलाव चौपाटीच्या आजूबाजूला सकाळी शौचास बसण्याचे आढळून आले. हा संतापजनक प्रकार शनिवारी २३ मे रोजी गडकुंभली रोडवरून पहाटे फिरायला जाणा-या नागरिक व डॉक्टरांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ “युवाराष्ट्र दर्शन” प्रतिनिधीला फोन करून हा संतापजनक प्रकार सांगितला. आणि नगरपरिषद ३० हजार रुपये कर कशासाठी घेतला तर असे येथे शहरात हागणदारी “युक्त” घाण करण्यासाठी टॅक्स वसूल केला का.? एकीकडे संपूर्ण भारत देशात हागणदारीमुक्त देश बनलेला असता साकोलीची नगरपरिषद ३० हजाराचा टॅक्स घेऊन भर रस्त्यावर पहाटे “हागणदारी युक्त” घाणेरडे शहर बनवायला निघाले काय.? वरून तलाव चौपाटीच्या महिला पुरुष शौचालयाला टाळे ठोकून शौचालय “लॉक अप” सारखे करून ठेवले आहे. 

                याबाबत गुरूवार २१ मे ला सायंकाळी ७:३० ला येथील “व्हीएसएफ” समुह मिना बाजार येथे धडकली होती. कारण नगरपरिषदेने मिना बाजार कडून ३० हजार कर घेतला पण जनतेच्या वाहन सुरक्षासाठी रात्री तेथे ना एकही चौकीदार, ना सीसीटीव्ही, ना सुरक्षा रक्षक आहेत.

येथे जर महिला मुलींसोबत छेडखानी, लुटमार, दागिने पळविणे, जनतेच्या दुचाकी चोरीला जाणे यांसारख्या गुन्हेगारी घटना झाल्या तर याला जबाबदार ३० हजार टॅक्स घेणारी नगरपरिषद राहील.? की ३० हजार कर देणारे मिना बाजार मालक राहतील.? असा संतापजनक आरोप करीत या सर्व मागणीवर अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन साकोलीचे अनिल कापगते, किशोर बावणे, आशिष चेडगे, पत्रकार डी. जी. रंगारी, ऋग्वेद येवले, अंकित कापगते, चंद्रशेखर कापगते, महेश पोगळे, मुकेश पंचभाई, दिगंबर सुर्यवंशी, विनायक बोरकर, प्रशांत लांजेवार, युगांतर बारसागडे तसेच सर्व व्ही एस एफ युनिटच्या सदस्यांनी हा इशारा दिला आहे.