Home अमरावती गझल मुशायरा ने साहित्य संमेलनात आणली रंगत

गझल मुशायरा ने साहित्य संमेलनात आणली रंगत

71

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.24मे):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह भीम टेकडी अमरावती येथे शब्दास्त्र विचार मंच, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट अमरावती द्वारा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे,स्मृतीशेष सुखदेवराव तिडके,स्मृतीशेष सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृती दिनानिमित्त ,चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन १७ मे रोजी पार पडले.आयोजित साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात गझल मुशायरा ठेवण्यात आला होता.

      ज्येष्ठ गझलकार सुदाम सोनुले हे या गझल मुशायराचे अध्यक्ष होते. या गझल मुशायरात प्रख्यात उर्दू गझलकारा नर्गिस अली,अतुलकुमार ढोणे, अनिल अघम, प्रवीण कांबळे(शब्दास्त्र),अब्दुल समद रजा, विद्रोही अविनाश गोंडाणे, मधु हिरेकर हे सहभागी झाले होते.गझलकार अतुलकुमार ढोणे यांनी होणार साध्य नाही मस्तीत नाचल्याने 

होते विचार क्रांती साहित्य वाचल्याने या गझलेतून बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेण्याचे कथन करीत क्रांतीस प्रेरित केले .अनिल अघम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामीच्या साखळदंडात बंदिस्तांना मोकळे केले आणि जगण्याला अर्थ नसणाऱ्यांच्या जगण्याला अर्थ आला हे डोळ्यासमोर ठेवून ,बाबा तुझ्या प्रयत्ने,सारे घडून गेले

आयुष्य वाळवंटी , बगिचे बनून गेले अशी आशय संपन्न गझल सादर केली.नर्गिस अली यांनी हमने भी जान गवाही है चमन की खातिर

हमको नफरत से नहीं प्यार से देखा जाए

अशी देशासाठी प्राण देणाऱ्या वीरांप्रति आदरभाव ठेवणारी गझल ठेवली.शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांनी,लढतोच बा भिमाचा सैनिक अजून आहे 

हक्कास वंचितांच्या तो ही दटून आहे 

अशी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारी गझल ठेवली.गझलकार विद्रोही अविनाश गोंडाणे यांनी,”सन्मार्ग चालतांना झालोच मग अचंबित;

ढोंगीच माणसाचा संचार पाहिला मी” या गझलेतून आलेला अनुभव मांडला.अब्दुल समद रजा यांनी,”मेरे दिलरूबा के जैसा कोई दिलरूबा नहीं है 

वो है जितना खुबसुरत कोई दुसरा नहीं है” ही प्रेमरस गझल सादर केली तर

पवन डोंगरे,मधु हिरेकर यांनी हृदयाला भिडणारी गझल सादर केली.गझल मुशायराचे अध्यक्ष जेष्ठ गझलकार सुदाम सोनुले यांच्या,”केली न काल पर्वा ज्यांनी इथे घरची 

त्यांच्या पिढीत होती युगहाक संगराची” या आशयपूर्ण गझलने गझल मुशायराची सांगता झाली.

संचालन राष्ट्रीय निवेदक पवन डोंगरे यांनी केले.आभार संजय डोंगरे यांनी मानले.