▪️”एक पेड मा के नाम” अंतर्गत केले वृक्षारोपण
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.24जुन):-आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चणाखा (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकं वितरण सोहळा घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे हे होते.
तर प्रमूख अतिथी म्हणून उपाध्यक्ष मनोहर साबणानी , शाळेचे मुख्याध्यापक तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चनाखा (ग्रामीण) चे अध्यक्ष दिपक सातपुते , सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, दिपक मडावी, सोनल नक्षीने, ,नेहा तळवेकर, सविता गेडेकर उपस्थित होते. 2025-26 या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परिचय करून घेतले व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
वर्ग 1 ते 5 च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थना मसाला भात व जिलेबी खाऊ घालून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शिक्षकानी स्वतःचा परिचय करून दिला. सोबतच शालेय शिस्तीबद्दल अवगत केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक बंडू बोढे यांनी केले. प्रास्तावीक मुख्याध्यापक दिपक सातपुते यांनी केले.



