

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.10जून):-तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल-पनवेल महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.06 जुन 2026 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त पाडळी येथील राममंदिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रमुख उपस्थिती मा.डॉ.संजय आवडे (सदस्य पंचायत समिती कोरेगाव) तसेच कॅम्प मध्ये 74 पेशंटचे रजिस्ट्रेशन झाले व 37 पेशंट मोतिबिंदूचे सापडले होते.
त्यातील 13 पेशंट चे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी रित्या दि.08 जुन 2026 रोजी पुर्ण झालेली असून कॅम्प चे इन्चार्ज मा.ॲड सुजय कोल्हापूरे सर यांचे अनमोल असे सहकार्य संस्थेला लाभले तसेच कॅम्प चे आयोजन व नेतृत्व मा.प्रज्वल आवडे (अध्यक्ष) व मा.अमोल आवडे (संस्थापक अध्यक्ष) संयोजक मा.महेश आवडे (कार्यकारी अध्यक्ष) मा.सचिन आवडे (खजिनदार) मा.चेतन आवडे (उपाध्यक्ष),मा.श्रवण आवडे, साहिल आवडे,अनुज आवडे इ.सहकारी सदस्यांनी कॅम्प यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.







