Home महाराष्ट्र प्रथम स्टेजला होमिओपॅथिक उपचार पद्धतीकडे आला तर त निश्चित यश – मंत्री...

प्रथम स्टेजला होमिओपॅथिक उपचार पद्धतीकडे आला तर त निश्चित यश – मंत्री प्रतापराव जाधव

114

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.13जून):-होमिओपॅथिक औषध उपचार पद्धतीवर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे मनुष्य हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेपला आल्यावर शेवटच्या टप्प्यामध्ये होमिओपॅथिक औषध उपचार पद्धतीकडे वळतो परंतु तोच आजार जर प्रथम स्टेजला होमिओपॅथिक उपचार पद्धतीकडे आला तर त्यामध्ये निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही. असे दिनांक 13 जून रोजी गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव (सायाळा) या ठिकाणी आयोजित इरुक्सा प्रायव्हेट लिमिटेड या फार्मचे उद्घाटन केल्यानंतर देशाचे केंद्रीय आयुष तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करताना म्हटले आहे.

मंचावर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर परभणीचे आमदार राहुल पाटील गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे माजी खासदार सुरेश जाधव, मुंजाजी भाले, माणिकराव पुंडे, बाबुराव घाटोळ, कल्याणराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश फड उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेबराव भोसले,ॲड सय्यद अकबर,चितराताई गोरेगावकर, उमाकांत कोल्हे,शाहु मुंडे हे या वेळी उपस्थित होते.होमिओपॅथीचे डॉक्टर एक अर्धा तास पाऊण तास अगदी तुमचा पूर्ण इतिहास तुमच्या कुटुंबाची इतिहास हा आजार कशामुळे झाला असेल कशामुळे होऊ शकतो याचा सगळे तपासून नंतर त्याच्यावर उपचार केले जातात आजाराला समुळ नष्ट करण्याचे काम या होमिओपॅथिक मध्ये केल्या जातो. पण दुर्दैवाने आपण पाहतो त्या पारंपारिक उपचार पद्धती अतिशय चांगल्या सर्व प्रकारच्या आजारावर अतिशय प्रभावीपणे औषध आणि उपचार या सगळ्या आयुर्वेद मध्ये आहे पण लोकांचा विश्वास होमिओपॅथीचे डॉक्टर संजय पवार साहेब आहेत.

त्यांनाही अनुभव असेल हे आपल्याला जर एखादा मोठा आजार झाला तर आपण लगेच मल्टीस्पेशालिटी स्पेशलिस्ट डॉक्टर शोधून आपण त्या ठिकाणी उपचार घ्यायला आणि मग ज्यावेळी तो आजार दुरुस्त होत नाही आणि मॉडर्न मेडिसिन मधले सर्व उपचार थांबलेले असतात किंवा संपलेल्या असतो आता आम्हाला जेवढा उपचार करणार होते ते केले आता याच्यापेक्षा जास्तीचे उपचार आमच्याकडे नाही बऱ्याचदा असं सांगितलं जातं की आता रुग्णाला घरी घेऊन जा आणि त्याची सेवा आणि मग घरचे लोक आयुर्वेदात कोणी वैद आहे का होमिओपॅथी डॉक्टर उपचार करणार आहे का कुठेतरी नाव कळतं आणि मग एकदम चौथ्या स्टेजला गेलेला पेशंट हा आमच्या होमिओपॅथी आयुर्वेदिक डॉक्टर कडे येतात त्याची परीस्थितीमध्ये डॉक्टर त्याला रिलीफ देण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरतात.

गंगाखेड तालुक्यासारख्या ग्रामीण भागामध्ये राहून होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये मागील 30 ते 40 वर्षापासून डॉक्टर संजय पवार हे काम करीत असून त्यांनी बरेचसे रुग्ण या होमिओपॅथिक उपचार पद्धती माध्यमातून बरे केले आहे ‌

यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर परभणीचे आमदार राहुल पाटील गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

येणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार डॉ संजय पवार यांनी मानले.