काँक्रीट मिक्सर मशीनला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बांधकामगाराचा मृत्यू

194

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378

 नागभीड(दि.16जुलै):- तालुक्यातील मांगली (अरब )येथे काँक्रीट मिक्सर मशीन ला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बांधकामगाराचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव ईश्वर मुखरू झाडे असे(वय 22वर्ष )असून तो कसर्ला येथील रहिवासी आहे. सदर घटना आज सकाळी 9.30 वाजताचे दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.ईश्वर च्या पायात चप्पल नसल्याने त्याच्या शरीरातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाला अन्य मजुरांच्या पायात चप्पल असल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला.

नागभीड तालुक्यातील मौजा कसर्ला येथील युवक ईश्वर मुखरू झाडे हा बांधकाम ठेकेदारकडे मजुरीचे काम करीत होता. आज मंगळवारी सकाळी तो मांगली (अरब)येथील पपेंद्र भोयर यांचे घराचे स्लॅब चे कामाकरिता गेला होता. स्लॅब टाकण्याकरिता कॉन्क्रिट मशीन लावीत असतांना मशीन च्या धक्काने जिवंत विद्युत तार तुटून मशीनवर पडली. यामुळे काँक्रिट मशीन मधून विद्युत प्रवाह प्रवाहित झाला. यामुळे ईश्वर झाडे अत्यवस्थ झाला.

त्याला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेत असतांना वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. नागभीड पोलिसांनी प्रेताचा पंचनामा केला. प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यात आली.या प्रकरणात बांधकाम ठेकेदार हितेश रवींद्र सतिबावणे याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती नागभीड पोलिसांनी दिली आहे पुढील तपासणी नागभीड पोलीस करीत आहेत.