

✒️अहेरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहेरी(दि.31जुलै):-जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या येदरंगा येथील एका मृतक इसमाचे मृतदेह त्यांचा स्व:गावी पोहोचवून देण्यासाठी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली वरून खाजगी वाहनाची व्यवस्था करून दिली आहे.
येदरंगा येथील कापा इरफा कुळमेथे यांची तब्यत बिघडल्याने त्यांचे जावयानी त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले होते.परंतु उपचारादरम्यान त्यांची मृत्यू झाली.मृतक कुळमेथे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्यांचे मृतदेह भाड्याने खाजगी वाहन करून स्वगावी आणणे अडचणीचे ठरत होते.
या दरम्यान मृतकाचे जावयाने काँग्रेस नेते कंकडालवार यांचे खंदे समर्थक शिवराम पुल्लूरी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून त्यांनी मृतकाबद्दलची माहिती त्यांना सांगितले होते.
सामाजिक कार्यकर्ते शिवराम पुल्लूरी यांनी या दुःखद घटनेची माहिती अजयभाऊ कंकडालवार यांना तात्काळ कळविले असता अजयभाऊ कंकडालवार यांनी मृतकाचे मृतदेह त्यांचा स्वगावी पोहोचवून देण्यासाठी भाड्याने खाजगी वाहन करून देण्याची पुल्लूरी यांना सांगितले असता शिवराम पुल्लूरी यांनी क्षणाचेही विलंब न करता मृतकाचे मृतदेह स्वगावी नेण्यासाठी गडचिरोलीवरून येदरंगा साठी खाजगी वाहन उपलब्ध करून दिले.यावेळी मृतकाचे कुटुंबियांनी या सत्कार्यांबद्दल काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार व शिवराम पुल्लूरी यांचे आभार मानले.



