श्री प्रभू सॉफ्टलिंक प्रा.लि.ची स्वप्नपूर्ती एक अविस्मरणीय स्मरणिका

118

 

स्वप्नपूर्तीत वाहतो ।   

          विचारांचाच सुगंध ॥

          वाचकांना वाचताना ।

          पानोपानी शब्दगंध ॥

                   श्री प्रभू सॉफ्टलिंक प्रा.लि.चे प्रबंध संचालक,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,महानुभाव पंथाचे प्रसारक,प्रख्यात वकील, आयकर सल्लागार ॲड.अरुण ठाकरे यांच्या श्री प्रभू सॉफ्टलिंक प्रा.लि. व ॲड.ठाकरे ॲन्ड असोसिएटस्च्या आयकर विषयक कार्य सेवेला रौप्य महोत्सवी वर्ष उजाडले.या पंचवीस वर्षपूर्ती निमित्त मोठ्या प्रमाणात रौप्य महोत्सव आणि सोबतच श्री प्रभू सॉफ्टलिंक प्रा.लि.अमरावती या प्रतिष्ठानचे नवीन भव्य वास्तूमध्ये स्थलांतर करण्याचा कार्यक्रम आणि “स्वप्नपूर्ती” या स्मरणिकेचे प्रकाशन नुकतेच मोठ्या प्रमाणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

          स्वप्नपूर्तीत गुंफल्या ।

          आठवणी त्या सुंदर ॥

          कर्तृत्वाची गाथा ।

          सर्व दूर ती जाणार ॥

              या रौप्य महोत्सवाच्या सोहळ्यामध्ये मागील पंचवीस वर्षातील आठवणींना उजाळा देणारी तसेच या पंचवीस वर्षाच्या प्रगतीचा आलेख साकारणारी ‘स्वप्नपूर्ती’ नामक स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते या सोहळ्यात करण्यात आले.

सर्वांगसुंदर मल्टीकलरमधील स्मरणिका बघून आणि ॲड. अरुण ठाकरे आणि कुटुंबाला, त्यांच्या कार्याला शुभेच्छा संदेशातून व लेखातून मान्यवरांनी दिलेल्या शुभकामना व पंचवीस वर्षातील कार्यसेवेची शब्दबद्ध केलेली माहिती वाचून मला खूप आनंद झाला;म्हणून ” स्वप्नपूर्ती ” या स्मरणिकेचा परिचय देण्याचा हा माझा अल्पसा प्रयास. 

        अष्टपैलू व्यक्तिमत्व ।

        अरुणराव ठाकरे ॥

        कार्यालयी वाहतात ।

        आनंदाचे गोड वारे ॥ 

                    या स्वप्नपूर्तीमध्ये ॲड.अरुण ठाकरे,ॲड.अमोल ठाकरे आणि ॲड.अपर्णा ठाकरे अर्थात ठाकरे कुटुंबियांच्या स्वप्नांची पूर्ती या पंचवीस वर्षात कशी झाली? या विषयीची संपूर्ण माहिती प्रासादिक भाषेतून सांगण्याचा प्रयास मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशातून व लेखकांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेला दिसतो तसेच या स्मरणिकेत पंचवीस वर्षात राजकीय पुढारी,नेते मंडळी यांनी कार्यालयाला भेटी दिल्याचे अनेक महत्त्वाचे अविस्मरणीय फोटो,कार्यालयात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांच्या आणि ॲड.अरुण ठाकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वृत्तपत्रातील बातम्याची कात्रणे,मान्यवरांचे शुभेच्छा संदेश,अनेक मित्रमंडळीचे कौतुकाचे व गौरवाचे लेख तसेच काही आठवणी वाचकांना वाचायला मिळतात,तसेच ॲड.अरुण ठाकरे यांच्या ॲड.अपर्णा अमोल ठाकरे या चणाक्ष स्नुषा असून त्या

एल.एल.बी.,एल.एल.एम. (व्यवसाय कायदा),बौद्धिक संपदा कायद्यातील पदविका शिक्षण पूर्ण करून आज राज्याच्या नोटरी (भारत सरकार)म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.आयकर क्षेत्रात गेल्या १० वर्षांचा त्यांना अनुभव आहे.पेटंट, ट्रेड मार्क, कॉपी राईट यासारख्या बौद्धिक संपदा कायद्यात काम करणे,विविध संस्थांच्या पॅनेलवर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्य करणे , आयकर या विषयावर अतिथी व्याख्याने देणे इत्यादी कार्य त्यांचे सतत सुरू असते.विशाखा समितीच्या त्या सदस्य, जे.सी.आय गोल्डन अमरावती या संस्थेच्या त्या माजी सचिव व विद्यमान उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्राच्या आयडॉल्स “सकाळ द्वारे महिला आयकॉन पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.”स्वप्नपूर्ती ” ही स्मरणिका सर्वांग सुंदर करण्या मध्ये अँड.अरुण ठाकरे यांच्या ॲड.अपर्णा या स्नुषेचा उत्तम सहभाग लाभलेला आहे .ही स्मरणिका अधिकाधिक वाचनीय आणि वाचन सांस्कृती वृद्धिंगत करणारी कशी होईल यावर स्मरणिकेच्या संपादक मंडळाने आणि मेधा पब्लिशिंग हाऊसचे संचालक श्री.संजय महल्ले यांनी भरपूर परिश्रम घेतल्याचे वाचनाअंती दिसून येते.विशेष म्हणजे ॲड.अमोल ठाकरे यांची मुखपृष्ठ संकल्पना असून आकर्षक मुखपृष्ठ सर्वांनाच आवडेल यात शंका नाही.

     कविश्वर कुळाचार्य प.पू.म.श्री मोहनराज कारंजेकरबाबा महानुभाव,संचालक महानुभाव आश्रम,राजापेठ,अमरावती यांनी

आपल्या शुभेच्छा संदेशातून

“ॲड.अरुण ठाकरे यांचं एकत्र कुटुंब प्रणालित आनंदाने जीवन जगणारं कुटुंब सर्वांना प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.कधी कधी सुंदरतेपेक्षा एखादया व्यक्तीचा साधेपणाच मन हिरावून घेतो. जीवनात येणारी संकटं, चढ-उतार यांना आपली जबाबदारी ओळखून कार्यरत राहिले ; म्हणूनच त्यांच्या या प्रतिष्ठानास प्रसिद्धी लाभली. 

      ॲड.अरुण ठाकरे ।

      आयकर सल्लागार ॥

      श्री प्रभू सॉफ्ट लिंकचा ।

      उचलला पूर्ण भार ॥ 

सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी स्नेहिजनाचे सत्कार, मेळावे,महानुभाव पंथीय व्याख्यानमालासह संत महंताची सेवा,विविध संस्था – मदिंरामध्ये सहभाग हे तर त्यांच्या जणू अंगवळणीच पडलं,त्याला कारणीभूत त्यांची श्रद्धाभक्ती आणि गुरुजनांचा आशीर्वादच म्हणावा लागेल.”असे आपल्या शुभेच्छा संदेशात सांगून 

कविश्वर कुळाचार्य प.पू.म.श्री मोहनराज कारंजेकरबाबा यांनी

ठाकरे परिवारास दीर्घउन्नतीसह दीर्घायुष्याच्या शुभकामना दिल्या.

      ॲड.आकाश पांडुरंग फुंडकर

मंत्री कामगार,महाराष्ट्र राज्य यांनी “ॲड.अरुण ठाकरे यांनी 

२५ वर्षापूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेऊन आयकर क्षेत्रात,शिक्षण क्षेत्रात जनहिताच्या दृष्टीने सल्ला केंद्र सुरू केले. या कार्यात त्यांचे सुपुत्र ॲड.अमोल ठाकरे यांनी एच.डी.एफ.सी. बँकेतील मोठ्या हुद्यावरील लठ्ठ पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन सहभाग सुरू केला.ॲड.अमोल ठाकरे यांच्या कुशाग्र,बुद्धिमान, मनमिळावू स्वभावाने कार्याचा व्याप वाढत गेला.याच कारणाने त्यांचा जनसंपर्क वाढून ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सलग दोनदा सिनेट सदस्य झाले.त्यांना ॲड.अपर्णा सारखी प्रज्ञावान सहचारिणी लाभली त्यामुळे रोपट्याचा वृक्ष होऊन तो अधिकच बहरत गेला.

श्री प्रभू सॉफ्टलिंक कंपनीची स्थापना झाली. शालेय स्तरावरून विद्यापीठ स्तरावर आयकर सल्लागार कार्यालयाचा कार्यभार वाढला.आज बहुमजली इमारतीत कार्यालय सुरू होत आहे. या उद्‌द्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्या कुटुंबीयासोबत कंपनीच्या उत्कर्षात सहभागी मित्र, सहकारी,कर्मचारी सर्वांचेच त्रिवार अभिष्टचिंतन.या निमित्त प्रगतीचा आलेख साकारण्या-या स्मरणिकेस प्रकाशन प्रसंगी हार्दिक शुभेच्छा.आपले कार्य 

असेच वृद्धिंगत होत राहो, ही सदिच्छा आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये ॲड.आकाश पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केली.

             मा.श्री हर्षवर्धन देशमुख,माजी मंत्री तथा अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी ॲड.अरुण ठाकरे उच्च शिक्षित असून पंचवीस वर्ष परिवाराच्या गरजेसाठी शाळेत नोकरी केली व मग अचानक स्वेच्छा निवृत्ती घेऊन वकिली सारखा अस्थीर तसेच यशस्वीतेबद्दल अजिबातही हमी नसलेला व्यवसाय त्यांनी २५ वर्षापूर्वी सुरू केला. त्यांचे सुपुत्र ॲड.अमोल इंजिनियर झाल्यावर त्यानेही आपली पाच वर्षाची कायम झालेली चांगल्या कंपनीची नोकरी सोडून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या व्यवसायात उडी घेतली ही कौतुकाची बाब आहे. आज इंजिनियर झालेली मुले परदेशातील मुबंई,पुणे,बंगलोर येथील नोकरीचे स्वप्न पाहतात व आई वडिलांच्या,कुटुंबाच्या इच्छविरुद्ध बाहेर नोकरी करून कुटंबापासून – आई वडिलांपासून विभक्त होतात;पण अमोलने तसे न करता आई वडिलांच्या व्यवसायाला नूसताच हातभार लावला नाही तर तो उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन ! व्यवसायाचा रौप्य महोत्सव, नूतन वास्तूत प्रवेश,सत्कार समारंभ व स्मरणिका प्रकाशनास मनःपूर्वक शुभेच्छा व भविष्यातील आपल्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

              डॉ.मिलींद अ.बारहाते,

कुलगुरू,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांनी श्री प्रभू सॉफ्टलिंक प्रा.लि. कंपनीचे कार्यालय अत्याधुनिक नवीन बहुमजली इमारतीमध्ये स्थानांतरीत होत असल्याचे ऐकून आनंद झाल्याचे सांगून सामान्य जनतेने गेल्या २५ वर्षांपासून टाकलेला विश्वास हीच खरी ठाकरे कुटुंबियांच्या कर्तृत्वाची पावती असल्याचे सांगितले आहे आणि बहुमजली इमारतीच्या उद्घाटनास व प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

            मा.श्री नानक अहुजा,

संस्थापक संपादक,प्रतिदिन अखबार,अमरावती यांनी, ॲड.अरुण माणिकराव ठाकरे यांना मी अगदी लहापणापासून ओळखतो.ते संत कंवरराम विद्यालयात नोकरी करीत असताना एक मराठी माणूस नोकरीत असताना एल.एल.बी., डी.टॅक्स.पर्यंत शिक्षण घेतो व शिक्षणाच्या बळावर नोकरीतून निवृत्ती घेऊन स्वतःचा व्यवसाय स्थापन करून त्यात यशस्वी होतो ही साधीसुधी गोष्ट नाही.

वडिलोपार्जीत इस्टेटीवर सर्वच मोठे होतात पण शुन्यातून विश्व निर्माण करणारे भगीरथ फारच थोडे त्यापैकीच एक म्हणजे ॲड.अरुण ठाकरे होत. असे विचार सांगून कार्यक्रमास , स्मरणिकेस व भविष्यातील उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या .

         मा.श्री श्रीराम पानझाडे,

शिक्षण सहसंचालक,शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक,महाराष्ट्र राज्य, पुणे

यांनी,ॲड.अमोल ठाकरे तथा ठाकरे परिवार यांना रौप्य महोत्सवी कार्यक्रम, 

         कर सल्लागार केंद्र ।

         आनंदाचे एक बेट ॥

         आदर्श संकुल जणू ।

         कार्यालय कार्पोरेट ॥

अशा कार्पोरेट कार्यालयाचा नूतन वास्तू प्रवेश, सत्कार समारोह व स्मरणिका प्रकाशन अशा भव्य, समारंभाबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत .मोठया पगाराची नोकरी सोडून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावला या बाबत ॲड.अमोल ठाकरे यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

           मा.श्री नरेशचंद्र म. पाटील, अध्यक्ष,डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक,अमरावती. यांनी शुभेच्छा संदेशात अँड.अरुण ठाकरे यांच्या स्वभावाचे वर्णन प्रासादिक भाषेत केले असून त्यांचा यशस्वी व्यवसाय बघून त्यांच्या कष्टाचे चीज झाले असे म्हटले आहे .

                 मा.श्री पी. एन. धोटे ,प्रशासन अधिकारी (से. नि.)शालेय शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालय, अमरावती यांनी ॲड. श्री.अरुणजी ठाकरे यांनी पाहिलेले एक स्वप्न आज रोजी पूर्णत्वास येत असल्याचे सांगून

त्यांच्या कर्तव्याला निष्ठेची व निष्ठेला कर्तव्यपरायणतेची जोड

मिळाल्यामुळे ठाकरे कुटुंबियांनी यशस्वी शिखर गाठले असे विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या .

               मा.डॉ.श्री.अविनाश आवलगावकर,कुलगुरू,मराठी भाषा विद्यापीठ,रिद्धपूर ता. मोर्शी,जि.अमरावती यांनी,

ॲड.श्री अरुणरावांच्या सन १९९९ मध्ये सुरू केलेल्या आयकर मूल्य निर्धारण कार्याचा व्याप वृद्धिंगत झाला.परिणाम स्वरूप त्यांना आज नव्याने बांधलेल्या इमारतीत आपला आयकर विभाग स्थलांतरीत करावा लागला.व्यवसाय वृद्धी अन् समृद्धीसाठी ॲड.अरुण ठाकरे यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यात त्यांचे सुपुत्र अमोल आणि स्नुषा सौ.अपर्णा यांची भक्कम साथ त्यांना लाभली. अरुणरावांचा आत्मविश्वास, मैत्री,प्रेम,श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यमानाच्या, सुंदर प्रवासाच्या पायऱ्या ओलांडताना स्वतःचं दुःख व आनंदाचं मोजमाप करणं थांबविलं आणि जीवन जगणं सोप केलं! त्यामुळेच त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत झाला असल्याचे मत व्यक्त करून माणूसकी त्यांच्या प्रतिष्ठानची तिजोरी आहे, गोड शब्द ही त्यांचे धन, दौलत तर शांतता आणि सालसता ही लक्ष्मी आहे.अशा या विविधांगाने नटलेल्या ध्येय वेड्या उद्योजकांचं नवीन वास्तूत पदार्पण म्हणजे खऱ्या अर्थान श्री प्रभू बाबांची कृपा असून श्री प्रभू सॉफ्टलिंक प्रा.लि.ची अधिकाधिक प्रगती होण्यासाठी दीर्घ – आयुष्याची कामना व सुदृढ आरोग्याकरिता शुभेच्छा दिल्या.

       तसेच मा.नीलिमा टाके – गुल्हाने, शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग,अमरावती,

 प्रा.डॉ.गजानन ठोकळ,विभाग प्रमुख यांत्रिकी, पिल्लाई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग न्यु पनवेल मुंबई ,प्रा.अश्विनी ठोकळ ,असि. प्रोफेसर,भारतीय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,खारघर ,नवी मुंबई. यांनी बहुमजली इमारतीच्या उद्घाटनाला,रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला व स्वप्नपूर्ती स्मरणिका प्रकाशनाला शुभेच्छा संदेशातून हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या .

     स्वप्नपूर्ती या स्मरणिकेत ” सामान्यातच असामान्यत्व दडलेलं असतं” या मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरचे कुलगुरू मा.डॉ.श्री अविनाश आवलगावकर यांनी आपल्या लेखात “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे .” या समर्थ रामदासांच्या उक्तीचा प्रत्यय ॲड.अरुण ठाकरे यांनी आपल्या कृतीतून समाजातील नवतरुणांपुढे ठेवला “. असे सार्थ वर्णन केले आहे.

     ” स्वप्नपूर्ती “या स्मरणिकेत “अमोल ठाकरे एक आजातशत्रू व्यक्तिमत्त्व ” या लेखांमध्ये मा.स्वतंत्र संचालक गेल इंडिया लिमिटेडचे प्रा.डॉ.रविकांत कोल्हे यांनी,”उत्तम व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेला व सतत हसतमुख असलेल्या अमोलची जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा तेव्हा असं लक्षात यायचं की, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा व दुसऱ्याच्या कपाळावर चंदन लावले ते आपलेही बोटे आपोआप सुगंधित होतात अशी भावना बाळगणारा अमोल निश्चितच आपल्या व्यवसायिक क्षेत्रात क्रांती करेल व एक नवा कीर्तिमान आपल्या सहकाऱ्यांसमोर ठेवेल आणि ती वेळ आपण आपल्या डोळ्यांनी आज बघत आहोत.

            आयकर सल्लागार ।

            सुज्ञ सुपुत्र अमोल ॥

            एक सिनेट सदस्य ।

            कार्य तया अनमोल ॥ 

“असे सार्थ वर्णन ॲड.अमोल ठाकरे यांचे केलेले आहे.

            प्रा.डॉ.वनिता केतकर – भूपत,संगीत विभाग, श्री शिवाजी कॉलेज,अकोला आणि प्रा.डॉ.गजानन केतकर,संचालक मधुसुदन संगीत विद्यालय, अमरावती यांनी ” इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी ” या लेखांमध्ये ॲड.अरुण ठाकरे,ॲड.अमोल ठाकरे व ॲड.अपर्णा ठाकरे यांच्या स्वभावाचे अचूक वर्णन केले असून त्यांना शतशः मानाचा मुजरा करून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

         संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सेवानिवृत्त सहाय्यक कुलसचिव डॉ. रामसिंह येवतीकर यांनी “बहुगुणी व बहुश्रुत असे ॲड.अरुण ठाकरे” या लेखामध्ये,”ठाकरे कुटुंबियांची परिश्रमीवृत्ती व मनमिळाऊ स्वभावामुळेच यश,कीर्ती, प्रतिष्ठा या कुटुंबाच्या मागे धावत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.ते केवळ ॲड.अरुण ठाकरे सरांनी व्यवसायाच्या वाढीसाठी घेतलेले अपार व अथक परिश्रमाचे फलीत आहे.यात त्यांचे सुपुत्र ॲड.अमोल आणि सून ॲड. अपर्णा यांची समर्थ साथ त्यांना लाभलेली आहे असे वर्णन करून स्मरणिकेच्या प्रकाशनाला व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

           श्रीमती उषा सुरेशचंद्र गावंडे यांनी ” ठाकरे परिवारचा गुणगौरव ” या लेखात , मा.श्री राजन देशमुख विमा अभिकर्ता यांनी ” ‘अ’ ॲड.अरुणचा ” या लेखात ” मा.श्री संजय महल्ले लेखक, प्रकाशक मेधा पब्लिशिंग हाऊस यांनी ” मराठी मनाचा स्वाभिमान ठाकरे परिवार ” या लेखात, मा.श्री गजानन माडीवाले ,सेवानिवृत्त,शिक्षण विभाग,अमरावती यांनी ” अभिष्टचिंतन ” या लेखात, माजी प्राचार्य डॉ.रमेश अंधारे यांनी ” अरुण आणि अमोल ठाकरेंचे प्रतिसृष्टी ” या लेखात ॲड.

अरुण ठाकरे आणि परिवार यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी अनुभव शब्दात वर्णन करून रोप्य महोत्सव,नवीन भव्य इमारतीचा वास्तु प्रवेश,सत्कार समारंभ व स्वप्नपूर्ती स्मरणिका प्रकाशनास शुभेच्छा देऊन भविष्यातील यशस्वी वाटचालीस मनस्वी सदिच्छा व्यक्त केल्या.माजी सिनेट सदस्य,अरुणोदय बहुउद्देशीय संस्था,हिरापूर व गोपाल शिक्षण संस्था, टेम्बरूसोंडा या दोन्ही संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनिल रा.चऱ्हाटे यांनी आपल्या प्रतिक्रियेत ॲड.अमोल ठाकरे हे केवळ टॅक्स सल्लागार म्हणून मर्यादित न राहता अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ही सक्रीय असतात विविध शिबिरे,जनजागृती कार्यक्रम व शेतकऱ्यांसाठी कर सल्ला यासारख्या उपक्रमातून त्यांनी सामान्य नागरिकांना मोठी मदत केली आहे.” असे विचार आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त करून या भव्य दिव्य कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

         स्वप्नपूर्तीत दिसते ।

         परिपूर्ण स्वप्नपूर्ती ॥

         ठाकरेंच्या कुटुंबाची ।

         कष्ठमय कार्य स्फूर्ती ॥

                   ‘आयकर सल्लागार ॲड.अरुण ठाकरे यांनी ” स्वप्नपूर्ती ” या मनोगतात पंचवीस वर्षात हळूहळू स्वप्नपूर्ती कशी झाली याचे सविस्तर विवेचन करून उपस्थितीबद्दल सर्वांचे स्वागत केले आहे.

     या स्वप्नपूर्ती स्मरणिकेत वाचकांना कविताही वाचायला मिळतात.डॉ.सौ.रचना दिलीप मकेश्वर यांची ” प्रतिक्रिया मोलाच्या “,सौ.अपर्णा अमोल ठाकरे यांची ‘ स्मरणिका ‘,श्री चेतन उजवणे यांची ‘विश्वास’, सौ.शुभांगी अनंत निंबोळे यांची ‘ग्रंथाचे महात्म्य’ अशा प्रासंगिक कविता वाचायला मिळतात. 

          श्री प्रभू सॉफ्टलिंक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रबंध संचालक ॲड.अरुण ठाकरे,सौ. अनुराधा ठाकरे,ॲड.अमोल ठाकरे,ॲड.अपर्णा ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांच्या झालेल्या स्वप्नपूर्तीचे दर्शन या स्वप्नपूर्ती स्मरणिकेतून वाचकांना घडते.

           ही आकर्षक स्वप्नपूर्ती स्मरणिका संपूर्ण ठाकरे कुंटुबीय,श्री गजानन माडीवाले, चेतन उजवणे,सौ.अनघा कस्तुरे, रूद्रेश मोहिते,शिवांश अवस्थी यांचे तसेच संपूर्ण स्टाफ यांनी रात्रंदिवस घेतलेल्या परिश्रमातून तयार झालेली आहे. ॲड.अरुण ठाकरे यांनी त्यांच्या कार्यालयातच ” स्वप्नपूर्ती” ही स्मरणिका वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे, हे विशेष.

          अष्टपैलू व्यक्तिमत्व, महानुभावपंथाचे प्रसारक, प्रख्यात वकील,आयकर सल्लागार ॲड.अरुण ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे परिवारला हार्दिक शुभेच्छा ॥यापुढेही त्यांची अशीच प्रगती होत राहो,ही मनस्वी सदिच्छा ॥

       अर्पिली ही स्वप्नपूर्ती ।

       जनता जनार्दनाला ॥

       यशाची गाथा ही गोड ।

       आकर्षिते वाचकाला ॥

 ✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८८७७४८६०९