सर्पमित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करा सर्पमित्रांची मागणी

84

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.29जुलै):-जनसेवेसाठी तत्पर असलेले सर्पमित्र,प्राणी मित्रांकडे शासनाकडून दुर्लक्षित होत असल्याने सर्पमिञांना फ्रंटलाईन वर्कर मध्ये समाविष्ठ करून सर्पमित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणिमित्र संघटनेचा वतीने (दिनांक 26 जुलै मंगळवार)रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे गंगाखेड तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जनसेवेसाठी तत्पर असलेल्या सर्पमित्रांना प्राणी मित्रांना अपघाती विमा प्राणी मित्र विमा व सर्पदंश उपचार विमा मिळावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

सर्पमित्रांना प्राणी मित्रांना शासकिय ओळखपत्र देण्यात यावे सर्पमित्रांच्या प्राणी मित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवा या फ्रंटलाईन वर्कर सदरामध्ये समाविष्ट करून घ्यावे सर्पमित्रांची माहिती देणारे, नोंदणी करणारे नेटवर्क आणि पोर्टल उभारावे.गाव पातळी पासुन शहरामध्ये, जवळपास प्रत्येक जिल्हयात घराघरात, ऑफीस, शेत, गोठे अशा मानवाच्या व पाळीव प्राण्याच्या राहण्याच्या ठिकाणी विषारी व बिन विषारी साप निघतच असतात विषारी सापांच्या चावण्यामुळे जिवित व वित्त हानीचा धोका संभवतो बरेचदा हे अपघाताने व अनावधानाने किंवा सापांविषयक अज्ञानामुळे घडुन येते भिती पोटी, कितीतरी सापांची दिसताक्षणीच ठेचुन निघृण हत्या केली जाते.

त्यापैकी बरेचशे साप हे बिनविषारी पण असु शकतात दोन्ही प्रसंगातुन तळागाळातील निष्ठावंत सर्पमित्र प्राणी मित्र हे वेळोवेळी धोका पत्करून आपल्या कौशल्याचा उपयोग करून तात्काळ घटनास्थळी हजर होतात व असे विषारी व बिनविषारी साप पकडतात व लगेच त्यांना जंगलात किंवा सुरक्षित ठिकाणी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोडतात.

सर्पमित्र हा लाख मोलाचा आहे सर्पदंश होवुन सर्पमित्रांचा प्राणी मित्रांचा अपघात मृत्यु झाल्यास अपघात विमा योजने अंतर्गत त्यांना किंवा त्याच्या कुटुंबीयांला रुपये 25 लक्ष अपघाती विमा मंजुर करण्यात यावा समाजाभिमुख, समाजउपयोगी व निसर्ग रक्षणच्या कार्याला उचित सन्मान मिळण्यासाठी, त्यांच्या सेवेला फ्रंट लाईन वर्कर दर्जा देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे किरण भालेराव,चैतन लांडे,पंकज कांबळे, मन्मथ मंदोडे,चंद्रकांत उजेड,गजानन साखरे,महेंद्र समुद्रे आदींनी केली आहे.