स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एमआयएम पक्ष ताकदीने लढणार-मो.गौस झैन

73

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.30जुलै):-तालुक्यामध्ये एमआयएम पक्षाचे संघटन वाढवून भारतीय संविधानाला मानणाऱ्या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर ताकदीने लढणार असे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांनी केले.

ऑल इंडिया मजलीस ए इतेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) गंगाखेड शाखेच्या वतीने (दिनांक 30 जुलै बुधवार) रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून झैन बोलत होते. सदरील पत्रकार परिषदेस जिल्हा उपाध्यक्ष शेख हबीब,युवा जिल्हाध्यक्ष एहसान खान, ज्येष्ठ नेते अनिस कुरेशी,पूर्णाचे सलमान गाझी,गुलाम रब्बानी आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी एमआयएम पक्षाचे एकेकाळी जुने पदाधिकारी असलेले व सध्याचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शेख अजहर यांच्यासह सय्यद रुस्तुम,अमजद पठाण, शेख फैयाज राजा, शेख गफार यांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळास सोडचिट्टी देत जिल्हा समन्वयक मो.गौस झैन यांच्या उपस्थितीमध्ये स्वग्रही परत येत एमआयएम पक्षात प्रवेश केला.

पुढे बोलताना झैन यांनी म्हटले की, सत्ताधारी पक्ष जातीपातीचे राजकारण करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य करत असून मतदारांचा फक्त मतदान पुरताच वापर करून घेत विकास केला नाही आता मतदार राजा जागृत झाला असून आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप व भाजप पक्षाला पाठिंबा देणाऱ्या पक्षा व्यतिरिक्त समविचारी पक्ष्यांशी युती-आघाडी करून एमआयएम पक्ष संघटन व बुथबांधणी करून मोठ्या ताकदीने निवडणूक लढणार आणि जिंकणार असे म्हटले.एमआयएम पक्षाची सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन गंगाखेड तालुका व शहर कार्यकारणीची लवकरच निवड करण्यात येणार असून जो पदाधिकारी एकनिष्ठतेने पक्षाचे कार्य करील अशा पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यात येईल असेही म्हटले.

पत्रकार परिषदेचे आयोजन शहराध्यक्ष वहाज खान यांनी केले होते सदरील पत्रकार परिषदेस सद्दाम सौदागर,शेख चांदअली,मुजीब सौदागर,अकबर शेख,इम्रान पठाण,सलीम पठाण,वाजीद शेख आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.