रोटरी क्लब चिमूर तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ऍप चे वितरीत

126

 

चिमूर -ग्रामीण भागातील वर्ग १०वी च्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मदत व्हावी तसेच सोप्या पद्धतीने सर्व विषय समजता यावे यासाठी रोटरी क्लब द्वारा संपूर्ण मोबाईल ऍप तयार करण्यात आला आहे.शहरी भागातल्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थ्यांना महागड्या ट्युशन क्लासेस उपलब्ध आणि परवडण्यायुक्त नसतात.तसेच सतत भासणारी विजेची समस्या यामुळे अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो.त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज ओळखून रोटरी क्लब चिमूर तर्फे तालुक्यातील पांडुरंग दहिकर विद्यालय तळोधी (ना) व जय लहरी जय मानव विद्यालय मदनापूर येथील वर्ग १० वी तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ऍप वितरीत करण्यात आले.
या App मध्ये इंग्रजी,मराठी,सेमी इंग्रजी माध्यमाकरिता सर्व विषयांचा समावेश केला असून महत्त्वाचे नोट्स, अती महत्त्वाचे प्रश्न, परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न, रिकाम्या जागा,स्वाध्याय,उजळणी, काही सराव पेपर, व व्हिडिओ सोप्या पद्धतीने, व इतर असा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संपूर्ण माहिती समाविष्ट आहे.
या विषयी संपूर्ण मार्गदर्शन प्रोजेक्ट डायरेक्टर रोटे.अभिजित बेहते सर, कुशाब रोकडे सर यांनी करून App चे वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब चिमूरचे अध्यक्ष विनोद भोयर, सचिव राकेश बघेल, डॉ महेश खानेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजित बेहते,कुशाब रोकडे,पवन ताकसांडे,परेश दंदे, श्रेयस लाखे तसेच शाळेचे मुख्याध्यापक नारायण निखाडे, भक्तदास जीवतोडे इतर शिक्षक वर्ग, सर्व कर्मचारी हजर होते.