

चिमूर- नागरिकांमध्ये भारतीय तिरंग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय ओळख, देशभक्ती आणि अभिमानाची एक यशस्वी जनभागीदारी चळवळ निर्माण करण्याकरिता, केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार द्वारा देशभरात ‘हर घर तिरंगा’- ‘हर घर स्वच्छता’ ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेच्या एक भाग म्हणून चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांमध्ये ‘हर घर तिरंगा’- ‘हर घर स्वच्छता’ मोहिमेची जनजागृती करण्याकरिता, दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोज सोमवारला सकाळी 9:00 वाजता, नगरपरिषद चिमूर द्वारा जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅली मध्ये ग्रामगीता महाविद्यालय, चिमूरचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. या रॅली ची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालया पासून करण्यात आली तसेच रॅली चा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने चिमूर चे नागरिक, विद्यार्थी आणि नगरपरिषद चे कर्मचारी उपस्थित होते.



