केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते नागपूरातील कामठीच्या वेकोली अंतर्गत येणाऱ्या डुमरी साईडिंग इथं इलेक्ट्रिक व्हेईकलचे उद्घाटन.

98

 

नागपूर (31ऑगस्ट)- ऑगस्ट)केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील कामठीच्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड-वेकोली अंतर्गत येणाऱ्या डुमरी साईडिंग येथे इलेक्ट्रिक व्हेईकलचे उद्घाटन आज झाले .
या ठिकाणी असणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन जवळ वेकोलीच्या कामासाठी इलेक्ट्रिक ट्रक्स गडकरींच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. पारंपारिक इंधनाच्या वापरा ऐवजी इलेक्ट्रिक, सौर उर्जा, हरित हायड्रोजन यासारख्या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर केल्यास आपण इंधनावर आयात करत असलेल्या मोठ्या रकमेवर आपल्याला बचत करता येईल. सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असणाऱ्या लिथियम आयन बॅटरीची सुद्धा किंमत कमी झाली असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी बोलताना वेकोलीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक डॉ. हेमंत पांडे यांनी सांगितले की, पहिल्यांदा ही इलेक्ट्रिक व्हेईकल वेकोलिला मिळत असून या द्वारे निश्चितच प्रदूषणाच्या पातळीमध्ये घट होईल .

इलेक्ट्रिक उर्जा ही पर्यावरण पूरक असून या वाहनांमध्ये चालक आणि वाहकाला सुद्धा एक आरामदायक अनुभव मिळणार असल्याच त्यांनी सांगितले.

इनलॅन्ड वर्ल्ड लॉजिस्टिकच्या माध्यमातून 20 इलेक्ट्रिक ट्रक आता वेकोलीच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, वेस्टन कोल्फील लिमिटेड चे पदाधिकारी,इंन्लँड वर्ल्ड लॉजिस्टिकचे पदाधिकारी उपस्थित होते .