

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.2ऑगस्ट):-पोलीस स्टेशन अड्याळ अंतर्गत आरोपी नामे सुनील गोमाजी मेश्राम वय 40 वर्षे राहणार संगम पुनर्वसन तालुका जिल्हा भंडारा यातील फिर्यादी पेट्रोलिंग करीत असता नमूद आरोपी हा श्रीनगर येथील सभा मंडप रोडवर तस्करी करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील 3 रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी 20 लिटर प्रमाणे 60 लिटर प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 12000, एक कथीया जुपिटर गाडी अंदाजे किंमत 50 हजार रुपये असा एकूण 62 हजार रुपयांचा गुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध का. य. मी. अपराध क्रमांक 209/2025 कलम 65(अ) म.दा.का. नुसार अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुरुड हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर ,यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार कठाने स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन अधिकारी करीत आहेत.



