

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.7ऑगस्ट):- रोजी विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे मौजा देवाडा येथील विजय जंगू मंडाळी (वय 21 वर्ष) हे मौजा खिर्डी येथे शेतात काम करत असताना वीज पडून ठार झाला.तर
पाचगाव येथील चंद्रभान चौधरी यांच्या शेतात कामावर असलेल्या मधुकर तुकाराम सोयाम यांच्या बैलावर वीज पडून 1 बैल मृत पावले आहे. ही घटना साधारण दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
शहरातील काही सखल भागामध्ये ही पानी साचले. बामणवाडा येथील स्नेहदीप कॉलनीमध्ये जोरदार पावसामुळे कॉलनी जलमय झाले. नालेही ओसंडून वाहू लागले. मधल्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. आज मात्र दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने मुसंडी मारली .यावेळी वादळ वाऱ्यासह विजांचा गडगडात सह जोरदार पाऊस झाला.
सदर घटनांचे पंचनामे करण्याची सूचना तहसीलदार डॉक्टर ओमप्रकाश गोंड यांनी दिलेली आहे.
——–
🔸विजय मंडली यांच्या निधनाबद्दल शोक :
आज दुपारी राजुरा तालुक्यातील मौजा देवाडा येथील विजय जंगू मंडली (वय २१ वर्षे) यांचा शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दु:खद प्रसंगी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबात त्यांची आई व ते असा दोघांचाच कुटुंब होता. त्यामुळे मंडली कुटुंबासाठी ही दूर्घटना म्हणजे एकप्रकारे आघातच आहे.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो, अशीही मी प्रार्थना करतो.
या घटनेच्यासंदर्भात मी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश देत आहे. विजय मंडली यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
*आमदार देवराव भोंगळे*
राजुरा विधानसभा



