सातारा जिल्हा क्लस्टर अधिवेशन उत्साहात संपन्न !

118

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

   म्हसवड-सातारा(दि.12ऑगस्ट):- बी एस फोर अभियानांतर्गत भारतीय संविधान लोक महोत्सव अर्थात जिल्हा क्लस्टर अधिवेशन सातारा येथील शिक्षक बँक सभागृहात उत्साहात संपन्न झाले. 

    अधिवेशनाचे उद्घाटन प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक किरण यादव यांनी केले. त्यांनी भारतीय संविधान रक्षणाची प्रत्येक भारतीयांची जबाबदारी अधोरेखित केली.

     मुख्य अतिथी प्रा डॉ शामसुंदर मिरजकर यांनी अत्यंत सविस्तरपणे भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाच्या प्रगतीचा आदर्श दस्तऐवज असल्याचे सांगितले. 

     प्रथम सत्राची अध्यक्षता करताना केंद्रिय कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रभारी एम डी चंदनशिवे यांनी राष्ट्र, राष्ट्रीयता, राष्ट्रवाद, राष्ट्रीयकरण या संकल्पना सांगून राष्ट्रीयकरणाचे विरोधी हे राष्ट्रनिर्माणाचे विरोधक असल्याचे म्हटले.

     द्वितीय सत्रात गणेश वाघमारे यांनी भांडवलवादी व्यवस्थेविरुद्ध एकवटण्याचे आवाहन केले.चंद्रकांत खंडाईत यांनी मताच्या अधिकारावर भांडवली शक्ती प्रभाव कशा टाकतात हे मांडले. पार्थ पोळके यांनी भांडवलशाहीविरोधातील लढा क्रांतिकारी पद्धतीने लढण्याची आवश्यकता व्यक्त केली. 

       द्वितीय सत्रात अध्यक्षस्थानावरून बोलताना मूलनिवासी सभ्यता संघाचे धनंजय झाकर्डे यांनी अंशतः राष्ट्रीयकरणाचे फायदे सांगून लोकप्रतिनिधींची भांडवलदारांची गुलामी राष्ट्राला कशी रसातळाला घेऊन निघाली आहे याचे भयाण वास्तव मांडून संघटनात्मक ताकदीने देशातील सर्व मूळनिवासी बहुजनांना एकत्र करून राष्ट्र वाचवावे लागेल असे सांगितले. 

        सकाळी राष्ट्रीय गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून ओबीसी संघटनेचे प्रमोद क्षीरसागर, डॉ अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे रावण गायकवाड, शिवाजी कॉलेज चे प्रा डॉ पवार, भगवानराव अवघडे, शाहीर श्रीरंग रणदिवे, प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे, प्रा डॉ रामदास बोडरे, प्रा डॉ गोरखनाथ बनसोडे, ॲड प्रभाकर कांबळे, नवोदयचे प्रा. एकनाथ तेलतुंबडे,अनिस चे प्रकाश खटावकर, जनार्दन घाडगे, प्रा डॉ अनिल वीर, लक्ष्मण मोहिते, डॉ दीपा श्रावस्ती, डॉ पवार मॅडम, बजरंग डुबल, चाळके सर, चव्हाण सर, फिरोज मेटकरी, एल आय सी चे सागर पवार, नाग नालंदा चे त्र्यंबकेश्वर मिरजकर, बनसोडे मॅडम, इत्यादी असंख्य मान्यवर उपस्थित होते.

            स्वागत व प्रास्ताविक आभार जिल्हाध्यक्ष जी एस भालेकर यांनी तर आभार प्रा सुवर्णा काळे मॅडम यांनी मानले. द्वितीय सत्राचे प्रास्ताविक एम के के एम चे हणमंत सकलावे यांनी केले. 

        यावेळी जिल्ह्यातील पाटण, माण, कोरेगाव, जावळी, फलटण, खटाव, रहिमतपूर, सातारा, तालुक्यातून मूळनिवासी बहुजन बंधू भगिनीं उपस्थित होते.

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत सावंत, रोहन लोहार, सुशांत गायकवाड, सम्यक चंदनशिवे ,साधना चंदनशिवे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.