

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):-इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच वाढत्या स्पर्धेत टिकुन राहता यावे, यासाठी वसतीगृह सुरू करण्या्त आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी पदवी प्रथम वर्षात व पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून वसतीगृहासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज सादर करावा. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. वसतीगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना आधार व स्वयंम योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने अर्ज गृहपाल आम्रपाली टेंभुर्णे व मुलांचे गृहपाल धीरज डोंगरे यांच्याकडे वसतिगृहात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.
*प्रवेशाचे निकष व नियमावली खालीलप्रमाणे :* विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. फक्त पदवी प्रथम वर्षातच (Bacherlor Degree) शिक्षण घेणारा असावा. पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांच्या आत असावे. विद्यार्थ्याचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नॉन – क्रिमीलेअर तसेच कास्ट व्हॅलिडीटी जोडणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पान्ना्चा दाखला, बोनाफाईड व वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे. अर्ज भरल्यानंतर संपूर्ण कागदपत्रे जोडून सदर अर्ज इतर मागासवर्गीय मुलां / मुलींचे शासकीय वसतीगृहात जमा करावा.



