जिल्हा क्रीडा परिषदेची सभा संपन्न

79

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11ऑगस्ट):- जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर ची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातखेडे, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व आमंत्रित सदस्य उपस्थित होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका, यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या सत्रात सुरु होणाऱ्या तालुका, जिल्हा व म.न.पा.स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजनाकरिता विस्तृत चर्चा करण्यात आली. या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हयातील प्रत्येक शाळांनी सहभाग घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले.

सन 2021-22 पासून क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याकरिता क्रीडा कार्यालयामार्फत dsochandrapur.co.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सन 2025-26 या सत्रात तालुका, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा सदर प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी कळविले आहे.