

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.11ऑगस्ट):- सन १९४२ च्या इंग्रजाविरूद्धच्या स्वातंञ्याच्या क्रांतीलढ्यात गाजलेली भूमी चिमूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने हा लढा झाला होता व चिमूरचे नाव इतिहासात गाजले. भारताच्या नकाशावर आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेमुळे या गावात माध्यमिक, प्राथमिक व त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची सुरूवात झाली.
त्यानंतरच्या काळात चिमूरला मेडीकल काॅलेज, इंजिनिअरिंग काॅलेज, फार्मसी काॅलेज, कृषी महाविद्यालय, नर्सिंग काॅलेज इ.अनेक शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाचा अभाव दिसून येतो.
त्यामानाने पश्चिम व उत्तर महाराष्ट्र,मुंबई, कोकण, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर इ.भागात मेडीकल, इंजिनिअरिंग काॅलेज फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे विदर्भातील हुशार विद्यार्थ्यांना त्या भागात जावून शिक्षण घ्यावे लागत आहे. चिमूरची अनेक मुले इततत्र शिक्षण घेत आहे.
चिमूर गावात शाळा, काॅन्व्हेण्ट भरपूर प्रमाणात आहेत. परंतू आजपर्यंतही या भूमीत सरकारी वा खाजगी मेडीकल, इंजिनिअरिंग काॅलेज नाही. वर्धा जिल्ह्यात जाम चौरस्ता ता. समुद्रपुर येथे सरकारी मेडीकल काॅलेज मंजूर झालेले आहे.
चिमूरच्या भूमीत उच्च शिक्षणाच्या सोयींचा अभाव आहे. तसेच इथे उद्योगधंदे नसल्यामुळे रोजगारीचाही प्रश्न आहे. इथे एम. आय. डी. सी. आहे, पण पाहीजे तसे उद्योग नाही. म्हणून बेरोजगारीचाही प्रश्न आहे ह्या आवश्यक बाबी असल्यामुळे उच्च शिक्षण व उद्योगधंद्याची सोय चिमूरच्या भूमीत करणे आवश्यक आहे.



