सेवा सहकारी संस्था ह्या शेतकरी व जिल्हा बँकेचा दुवा असल्यामुळे गट सचिवांनी संस्थेच्या हितासाठी कार्यतत्पर असावे. – माजी आमदार निमकर

159

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजूरा- कोरपना व जिवती तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व गट सचिव यांच्या वतीने (16 ऑगस्ट) रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजूरा येथील विभागीय कार्यालयातील सभागृहात नवनिर्वाचित संचालक माजी आमदार सुदर्शन निमकर, संचालक श्री विजयराव बावणे, संचालक प्रा. ललितजी मोटघरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी गट सचिवांनी निदर्शनास आणून दिलेल्या अडचणी बँक व्यवस्थापना सोबत चर्चा करून सोडविण्यात येईल असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले. कार्यक्रमा चे अध्यक्ष माजी आमदार निमकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की शेतकरी व बँका यांना जोडणारा दुवा म्हणजेच सोसायटी असून गटसचिव व संस्थाध्यक्ष यांनी शेतकऱ्याच्या प्रगती आणि उन्नती साठी संस्थेच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरु करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संचालक प्रा.ललित मोटघरे यांनी आपल्या मनोगतातून शेतीचे अर्थशास्त्र अभ्यासपूर्ण समजण्यासाठी सोसायट्या व बँकानी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहाने आवश्यक आहे असे सांगितले. संचालक विजयराव बावणे यांनी शेतकरी आहे म्हणून बँक आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीवर बँकेची समृद्धी व विकास अवलंबुन आहे. यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते पंढरीजी चने, विभागीय अधिकारी बि. एल.जोगी, वरुर संस्थेचे उपाध्यक्ष चेतन जयपूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा व गट सचिवांच्या समस्या प्रास्ताविकातून व्यवस्थापक जगन दुर्गे यांनी मांडल्या. कार्यक्रमाचे संचालन जयंत गौरकार यांनी केले व आभार गट सचिव लोढे यांनी मानले. यावेळी तिनही तालुक्यातील संस्थांचे व्यवस्थापक, गटसचिव उपस्थित होते.