

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा : ग्रामपंचायत मंगी(बु) ही नेहमी प्रमाणे त्यांच्या विविध उपक्रमाकरिता जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दिनांक २१ ऑगस्ट २०२५ ला स्मार्ट ग्रामपंचायत मंगी (बु), अंबुजा सिमेंट कंपनीच्या सी एस आर उपक्रमांतर्गत अंबुजा फाउंडेशन उपरवाही, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगी(बु) शासकीय आश्रम शाळा मंगी (खुर्द), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगी(खुर्द)व समस्त ग्रामवासी यांच्या लोकसहभागातून एका मिनिटात ११०१ फळझाडे लावण्याचा विक्रमी उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश गौंड तहसीलदार राजुरा, विनायक पायघन तालुका कृषी अधिकारी, श्रीकांत कुंभारे अंबुजा फाउंडेशन क्षेत्रीय प्रमुख, प्रमोद खडसे प्राचार्य, सुभाष बोबडे उत्तम कापुस सहाय्यक प्रकल्प अधिकारी, रघुनाथ बबीलवार महिला सक्षमीकरण अधिकारी. गणेश बेले देशोन्नती प्रतिनिधी राजुरा, शंकरजी तोडासे सरपंच, वासुदेव चापले उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या धृपताताई आत्राम, सोनाली कोडापे, छाया कोटनाके,रामभाऊ तलांडे रसिकाताई पेंदोर माजी सरपंच, सोनबतीताई मडावी परशुराम तोडासाम अध्यक्ष तंटामुक्त समिती, सिद्धेश्वर जंपलवार, प्रदिप डोंगरे शिक्षक,स्नेहा गिरडे मॅडम,मेंगोराव कोडापे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,रत्नाकर भेंडे मुख्याध्यापक, ऋषी मेश्राम शिक्षक, नंदिनी कोरवते ग्रामपंचायत अधिकारी, बापुजी पेन्दोर, गणपत चापले, दिलीप आत्राम, मोतीराम पेंदोर, आनंद शंखदरवार मुख्याध्यापक, डॉक्टर किशोर कवठे, मारोती चापले मुख्याध्यापक मंगी (बु.)पंडित पोटावी, वनिता तुरारे, रजनी गेडाम मॅडम, मु. अ. जीवन लांडे, प्रदीप पावडे, तिनही शाळेतील सर्व विद्यार्थी, महिला नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा एक भविष्यातील वातावरण बदल बाबत सतर्कतेचे उचललेले पाऊल आहे हीच फळझाडे पूढील पिढीला सावली व फळे उपलब्ध करून देतील. जागतिक तापमान वाढी साठी वृक्षारोपण व संगोपन ही काळाची गरज आहे..स्मार्ट ग्राम मंगी बु. येथे मागील 3 वर्षात जवळपास २५ हजारांच्या वर वृक्ष लागवड करण्यात आलीत व नरेगा च्या 80 च्या वर महिला रोजगार त्यांची देखभाल व संगोपन करीत आहे. सदर उपक्रम हा जिल्ह्यात प्रथमच करण्यात आला गावाची लोकसंख्या १८ आहे.
मागील महिन्यातच ग्रामविकास मंत्रालयामार्फत लोकमत सरपंच अवॉर्ड ने मंगी बु. येथील सरपंच शंकरजी तोडासे यांना पर्यावरण या विषयावर जिल्हा व राज्य स्तरीय उत्कृष्ट कामाबद्दल गौरविण्यात आले. व २५ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायत ला मिळणार अशी घोषणा ग्रामविकास विभागाने केली.वृक्षारोपण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मसाले भात व जिलेबीचे जेवण देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.किशोर कवठे व आभार सहाय्यक सुधीर झाडे यांनी केले.



