आदर्श शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा.  आरतीचा मान शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा, विभाग स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना.  पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे राष्ट्रीय हरित सेने तर्फे गणेशभक्तांना आवाहन.

121

 

राजुरा ३१ ऑगस्ट
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे दरवर्षीप्रमाणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय हरित सेना इको क्लब , स्काऊट – गाईड्स , कब – बुलबुल या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन केले. राष्ट्रीय हरित सेना विद्यार्थिनी प्रमुख प्राप्ती पावडे हिने मातीचा गणपती तयार केला. विधिवत गणेशाची स्थापना करण्यात आली व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने प्रसाद वितरण करण्यात आले. पर्यावरणपूरक मातीची गणेशाची मूर्ती स्थापना करावी, कृत्रिम तलावात विसर्जन करावे, निर्माल्य नदी नाल्यात न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठीक ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, करिअर मार्गदर्शन, जनजागृती उपक्रम, गरजूंना मदत, शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकं, शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप, रुग्णसेवा, सामाजिक पर्यावरणीय संदेश देणारे देखावे उभारण्याचे आवाहन राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काउट्स मास्तर बादल बेले यांनी केले. यावेळी इयत्ता पहीली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनि नृत्य सादर केले व आरती गायन केले. गणेशाची आरती करण्याचा मान शालेय क्रीडा स्पर्धेतील जिल्हास्तरावर निवड झालेल्या कबड्डी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, व विभाग स्तरावर निवड झालेल्या कॅरम , कुस्ती स्पर्धेतील विजयी खेळाडूंना देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राष्ट्रीय हरित सेना इको क्लब विभाग प्रमुख बादल बेले, स्काउट्स मास्तर रूपेश चिडे- गाईड्स कॅप्टन रोशनी कांबळे, कब युनिट लीडर सुनिता कोरडे- बुलबुल युनिट लीडर अर्चना मारोटकर व त्यांचे प्रमुख सर्व शिक्षक, शिक्षीका, सेविका, विध्यार्थी यांची उपस्थिती होती.
——————————————–

*आदर्श शाळेचे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे अकरावे वर्ष*.
राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने बादल बेले यांच्या मार्गदर्शनात व सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र चंद्रपूर, राजुरा यांच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जातात. दहा वर्ष पूर्ण करून अकराव्या वर्षी सुद्धा हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यापूर्वी स्वच्छता अभियान, नगर परिषद राजुरा येथील गणेश विसर्जन कृत्रिम तलावाला भेट देऊन निर्माल्य संकलन, मातीचे गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक, गणेशाच्या पूजेकरीता लागणाऱ्या फुल झाडांची लागवड, सायकली रॅली, जनजागृती कार्यक्रम, प्लास्टिक वापर टाळणे बाबत जनजागृती असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहे.
———————————————