दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा सांसद परिषदेसाठी गंगाखेडच्या दोन युवकांची निवड

142

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, (8698566515)

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथील विधान भवनामध्ये दिनांक 29-30 जुलै रोजी युवा सांसद परिषद पार पडली.भारतीय लोकशाहीच्या मंदिरात तरुणाईची कायदा आणि तर्कशास्त्राची शक्ती पाहण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये गंगाखेड येथील ऋषी काबरा व राज तापडिया या दोघा युवकांना विद्यार्थी प्रतिनिधी वक्ता युवा संसद म्हणून आमंत्रित करण्यात आले होते दोन्ही युवकांनी परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदवत आपली प्रभावी शैलीने मोठा ठसा उमटवला.आगामी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा सांसद परिषदेसाठी दोघांची निवड करण्यात आली
विध्यार्थी परिषदेतर्फे सहभागी झालेल्या या दोघांनी “प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991” या वादग्रस्त कायद्याच्या विरोधात ठोस, सुसंगत व अभ्यासपूर्ण युक्तिवाद मांडला.या कायद्याविषयी बोलताना त्यांनी धार्मिक समभाव, ऐतिहासिक सत्य आणि घटनात्मक मूल्ये यांचा उल्लेख करत तो कालबाह्य झाल्याचे ठाम मत मांडले.त्यांच्या सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे संपूर्ण सभागृह दणाणून गेले व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.त्यांच्या या प्रभावी युक्तिवादाच्या जोरावर ऋषिकेश काबरा व राज तापडिया यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा सांसद परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे.
या यशामुळे गंगाखेड तसेच परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नागपूर विधान भवनामध्ये पार पडलेल्या युवा सांसद परिषदेला छत्रपती मालोजीराजे भोसले,मा.मंत्री परिणय फुके यांच्यासह विधानसभा सदस्य,विधान परिषद सदस्य आणि विशिष्ट पाहुण्यांची उपस्थिती होती.महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान व इतर राज्यांमधून आलेल्या प्रतिभावान युवकांनी या युवा सांसद परिषदेमध्ये सहभाग घेतला.