प्रा.अरुण बुंदेले एक बहुआयामी व्यक्तिमत्व:जिल्हाध्यक्ष निलेश जामठे

211

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.4ऑगस्ट):-” प्रा.अरुण बुंदेले यांनी साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याने एक वेगळा ठसा उमटविलेला आहे.त्यांनी स्थापन केलेल्या कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे सुद्धा त्यांचे कार्य सतत सुरूच असते.त्यांनी प्राध्यापक असताना चौतीस वर्ष विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून उच्च पदावर पोहोचविले. आज त्यांचे सेवानिवृत्तीनंतरही समाजप्रबोधन व शैक्षणिक प्रबोधन सुरूच आहे.असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.बुंदेले होतं.”असे विचार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री निलेश जामठे यांनी व्यक्त केले .

      ते दि.२ ऑगस्ट २०२५ ला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष,अभंगकार, साहित्यिक, समाजप्रबोधनकर्ते,कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले सर यांच्या चौसष्ठी निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे राजमाता जिजाऊ मॉसाहेब स्मारक, अमरावती येथे संपन्न झालेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात विचार व्यक्त करीत होते.

      राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन केल्यानंतर चौसष्ठीनिमित्त प्रा.अरुण बुंदेले यांचा पुष्पगुच्छ,मोमेंटो व श्री संत गुरू रविदास यांचे पुस्तक देऊन सत्कार व अभिष्टचिंतन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा सत्कार श्री पी.बी. वनस्कर साहेब,जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,सामाजिक कार्यकर्ते रमेशराव भटकर, उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड,श्री दीपकराव वानखडे,मोहनभाऊ पटके,गठाई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप वरजे,ॲड. आर.के.खराटे,मंगेश तांबेकर, रमन जामठे,व्ही.एल. इंगळे, अंबादास मोहकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,समाजिक कार्यकर्ते श्री पी.बी. वनस्कर, सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर ॲड.आर.के.खराटे यांनी भाषणातून प्रा.अरुण बुंदेले यांचे विविध क्षेत्रातील कार्य महत्वपूर्ण असल्याचे सांगून पुढील कार्यासाठी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.