अंध मुलींना जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन प्रा.बुंदेले यांनी साजरा केला स्वतःचा वाढदिवस

122

▪️अंध मुलींचे वसतीगृह चालविण्यासाठी देणगीदारांची आवश्यकता- अध्यक्ष पी.आर.पाटील

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.5ऑगस्ट):- माझ्या या अंध मुलींच्या वसतीगृहात इयत्ता ८ वी ते एम.ए.पर्यंत चे शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या निवासाची, भोजणाची व शिक्षणाची संपूर्ण निशुल्क व्यवस्था मी अध्यक्ष पी. आर.पाटील व माझी पत्नी सौ. नंदा पाटील आमच्या स्वतःच्या पगारातून व काही देणगीदाराच्या मदतीने करतो. आम्ही दोघेही अंध आहोत. आतापर्यंत या संस्थेमधून १०० अंध विद्यार्थिनी शिक्षण घेवून बाहेर पडल्या तसेच २० अंध विद्यार्थीनीचे लग्न सुद्धा लावून दिले. संस्थेमार्फत विदयार्थीनींना कॉम्पुटर, म्युझिक, होमसायन्स इत्यादीचे शिक्षण दिल्या जाते. या अंध मुलींच्या वसतीगृहाला शासनाचे कसल्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. त्यामुळे आम्हाला हे अंध मुलींचे वसतीगृह चालविणे अतिशय कठीण जात आहे. प्रा.बुंदेले सरांसारख्या देणगीदारांची आम्हाला आवश्यकता आहे कारण त्यांनी त्यांचा वाढदिवस येथे साजरा करून या अंध मुलींना जीवनावश्यक भरपूर वस्तू भेट दिलेल्या आहेत. अशीच मदत इतरांनीही आम्हाला करावी यासाठी मी संस्थेचा 

8788310430 हा फोन पे नंबर येथे सांगत आहे.”असे विचार संस्थाध्यक्ष पी. आर.पाटील यांनी व्यक्त केले.

         ते श्री पी.आर.पाटील शैक्षणिक व बहुउद्देशीय अपंग संस्था आणि उपेक्षित समाज महासंघातर्फे प्रा. अरुण बुंदेले यांच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमात अंध मुलींचे वसतीगृह, वडाळी येथे विचार व्यक्त करीत होते.

      सत्काराच्या व अंध मुलींना भेटवस्तू देण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड, सत्कारपूर्ती प्रा.अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी श्री पी.आर.पाटील शैक्षणिक व बहुउद्देशीय अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पी.आर. पाटील, माजी कारागृह अधीक्षक श्री कमलाकर घोंगडे, संस्था सचिव श्री मुकेश जोगेकर होते.

                                          प्रा.अरुण बुंदेले यांनी वाढदिवसानिमित्त अंध मुलींना दररोज आवश्यक असलेल्या 

विविध जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली. उपेक्षित समाज महासंघ व पी. आर. पाटील अपंग संस्थेतर्फे प्रा.बुंदेले यांचा सत्कार करून अभिष्ठचिंतन करण्यात आले.

     प्रसंगी अंध मुलींनी बर्थडे सॉंग सुमधूर स्वरात गायन करून प्रा.बुंदेले यांचे अभिष्टचिंतन केले.

     प्रा.अरुण बुंदेले एक समाजसेवी व्यक्तिमत्व – प्रा.श्रीकृष्ण बनसोड

           प्रा.बुंदेले सेवेत असताना केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य आज सेवानिवृत्तीच्या सहा वर्षानंतरही सुरूच आहे.त्यांनी समाजामध्ये विविध समस्यांबाबत जागृती करण्याचा सतत प्रयत्न केला तसेच त्यांनी निर्माण केलेल्या विविध प्रबोधन मालेतून व प्रकाशित पुस्तकातून हे त्यांचे कार्य आजही सुरूच आहे. वाढदिवसानिमित्त वडाळी येथील अंध मुलींच्या वसतीगृहामध्ये अंध मुलींना जीवनावश्यक अनेक वस्तू भेट देऊन त्यांनी आपला चौसष्ठावा वाढदिवस साजरा केला. अशा या समाजसेवी व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो,ही सदिच्छा ॥” असे विचार समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी अध्यक्षपदावरून व्यक्त केले.

  श्री पी.आर.पाटील यांनी स्वीकारलं सतीचं वाण- प्रा.अरुण बुंदेले

        ” श्री पी.आर.पाटील यांनी चालविलेले वडाळी येथील अंध मुलींचे वसतीगृह सतीचं वाण असून ते त्यांनी २००६ पासून स्वीकारलं ते आजही सुरूच आहे.शासकीय अनुदान नसल्यामुळे त्यांच्या या कार्याला जनमदतीची गरज आहे. प्राचाराअंती हे मदतकार्य पूर्ण होईल असे वाटते. त्यांच्या कार्याला मनस्वी शुभेच्छा ॥” असे विचार सत्कारमूर्ती प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

          याप्रसंगी मा.कमलाकर घोंगडे, प्रा.अरुण बुंदेले, प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले.

     या कार्यक्रमाला एम.ए. (इतिहास ) द्वितीय वर्षाला असलेल्या कु.सोनल प्रभाकर निटोने, वर्ग १० वी ला असलेल्या नांदेड येथील कु. समीक्षा अंबादास हनुवते,यवतमाळ येथील कु. रेणुका मारोती कांबळे, नांदेड येथील कु.संध्या बालाजी हमपोलकर, दारव्हा येथील कु. प्रगती सुधाकर ढवळे या अंध विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला कोषाध्यक्ष सौ. मंदाताई पाटील, सदस्या सौ.दीक्षा जोगेकर व नागरिकांची उपस्थिती होती.