इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे स्वातंत्र्य दिन साजरा

99

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव- इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रा. व्ही.जी.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी विद्यालयाचे चेअरमन डी.जी. पाटील सचिव सी.के. पाटील,संचालक,भरत पाटील,आदर्श विद्यालयाचे उपाध्यक्ष किरण पाटील, संचालक अश्विन पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील,आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, प्रा व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील ,पर्यवेक्षक ए. एस.पाटील,जेष्ठ शिक्षकेतर कर्मचारी भरत.बी.पाटील उपस्थित होते
सकाळी प्रभात फेरी विद्यालयापासून ते परिहार चौक, कोट बाजार, धरणी,मोठा माळीवाडा,बालाजी गल्लीजैन गल्ली ते शाळेपर्यंत काढण्यात आली
33 वर्षे प्रदीर्घ सेवा देणारे विद्यालयाचे जेष्ठ शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे संचालक भरत.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
ध्वजारोहणाचे संचलन क्रीडा शिक्षक फिलिप गावित यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले