पर्युषण पर्व निम्मित गंगाखेडमध्ये पहिल्यांदाच “सुपर वूमन स्पर्धा”

124

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.23ऑगस्ट):-गंगाखेडमध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी दिमाखदार “सुपर वूमन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. हा अनोखा उपक्रम भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट (BKBC Trust) यांच्या वतीने २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता नगरेश्वर मंगल कार्यालय येथे होणार आहे.

या स्पर्धेत गंगाखेड व परिसरातील २१ वर्षांवरील सर्व महिलांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गृहिणी, नोकरी करणाऱ्या तसेच उद्योजिका महिलांसाठी आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि संस्कृती सादर करण्याचे हे व्यासपीठ ठरणार आहे.

स्पर्धेअंतर्गत रॅम्प वॉक व स्टेज प्रेझेंटेशन होणार असून महिलांना “देवी स्वरूप” तसेच “ऐतिहासिक महान स्त्रिया” या थीमनुसार वेशभूषा करून आपली कला, ओळख व व्यक्तिमत्त्व सादर करता येणार आहे. सर्व सहभागी महिलांना सुपर वूमन प्रमाणपत्र व आकर्षक गिफ्ट दिले जाणार असून विजेत्या सुपर वूमनला सुंदर पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उपविजेत्यास सुंदर साडी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे परीक्षण नामांकित मान्यवर जजेस करणार असून त्यांचा निर्णय अंतिम राहील. आयोजकांनी सांगितले की या स्पर्धेत महिलांना आपला आत्मविश्वास, संस्कृती, संवादकौशल्य व ज्ञान सादर करण्याची संधी मिळणार आहे.

नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असून शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२५ आहे. अधिक माहितीसाठी ७२७६५४१५१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कांकरिया ट्रस्ट तर्फे सचिव सौ.मंजूताई दर्डा यांनी केले आहे.