जयदीप फाउंडेशन कडून पारधी समाजातील आठ विद्यार्थी शैक्षणिक दत्तक

85

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️पारधी समाजाला शिक्षण प्रवाहात आणणे गरजेचे : जयदीप शिंदे

म्हसवड-सातारा(दि.5ऑगस्ट):-पारधी समाज हा शिकारी करुन जगणारा समाज निसर्गाच्या कुशीत वसणारा व निसर्गा कडून जे मिळेल ते खाऊन समाधान मानणारा पण शिक्षणापासून वंचित असणारा हा समाज आहे

खटाव मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणारया जयदीप फाउंडेशन च्या माध्यमातून याच पारधी समाजातील विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला,उपेक्षित असणाऱ्या या समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणायचं काम जयदीप शिंदे यांच्या मार्फत सुरू करण्यात आलं आहे आज खटाव येथील पारधी समाजातील आठ मुलं शिक्षणासाठी जयदीप शिंदे यांनी शैक्षणिक दत्तक घेतली,त्यांना लागणारे शालेय साहित्य त्यांना त्यांच्या वस्ती वर जाऊन पुरवण्यात आले अतिशय हलाखीच्या परस्थिती असणाऱ्या व प्रतिष्ठित समाजाकडून चुकीचा नजरेने पाहिल्या जाणाऱ्या या समाजाला खऱ्या अर्थाने सामाजिक आधाराची ही गरज आहे

जंगल सोडून बाहेर च्या जगात हीं कुणी राहत ह्याचा ही अंदाज या समाजाला नव्हता जेव्हा त्यांच्या कडून त्यांचं जंगल हे घर हीरावून घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि जंगलाच्या बाहेर हीं एक जग आहे

पारधी समाजाला जंगलातून बाहेर करण्यात आल्यानंतर,त्यांची जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा यासाठी पारधी समाजाची धडपड सुरु झाली 

अन्ना अगोदर निवारा शोधण महत्वाचं होत निवारा शोधत असताना समाजांने व गावकऱयांनी पारधी समाजाला जवळ केले नाही गावातून दोन किलोमीटर जमेल तेथे पाल टाकून वास्तव्य हा समाज करू लागला आणि तेही काही काळापुरतेच कारण काही कारणामुळे तेथून हीं या समाजाची हकालपट्टी करण्यात यायची मग या समाजाला सतत सैरावैरा भटकत राहावे लागले.

 गावात हीं सुरुवातीच्या काळात या समाजाला खूप संघर्ष करावा लागला. 

 सामाजिक चळवळ समाजाच्या कामी पडू शकते हा ध्यास घेऊन या समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्याचं काम करणं ही काळाची गरज आहे पारधी समाज नुकताच वास्तव्यास लागला आहे काही ठिकाणी आता हीं भटकंती सुरूच आहे येथे पोटाची भूक भागत नाही शिक्षणाची कसे भागेल हा प्रश्न आहे. निरक्षतेचे घाव भरन्यासोबत या समाजाला आर्थिक रित्या नव्हे तर शैक्षणिक व मानसिकरित्या ही मदत हवी आहे ही मदत करण्याचा काम जयदीप शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून होत राहिलं असे प्रतिपादन जयदीप शिंदे यांनी केले या कार्यक्रमासाठी खटाव गावचे पोलीस पाटील अक्षय भोसले व विक्रम देशमुख उपस्थित होते.

मदत केलेल्या आठ विद्यार्थ्यापिकी इयत्ता 6 वि मध्ये शिकणारी सिद्धी आतेश *भोसले आणि शौर्य आतेश भोसले यांच्या डोक्यावरील बापाचं छत्र दोनवर्षांपूर्वी हरवलं आहे,ज्या वेळी ही घटना तेथील एका व्यक्तीने सांगितले त्यावेळी पोरीच्या डोळ्यात पाणी बघून,मन हेलावून गेलं त्यामुळे या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा शेवट पर्यंतचा खर्च आज मी स्वतः उचलला असल्याचे जयदीप शिंदे यांनी सांगितले.