

संजीव भांबोरे
भंडारा- तालुक्यातील पहेला येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा चिखलपहेला येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व विदर्भात नागपूरसह गेल्या कित्येक वर्षापासून तान्हापोळा साजरा करतात. अनेक पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या पोशाखामध्ये, लाकडी नंदीबैल सजवून आणतात. तो परिसर तोरण, पताका, फुगे, लावून सजवितात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महादेवाची गाणी म्हटले जाते. मुलांना शेतीत राबणाऱ्या बैलांचे महत्त्व कळावे त्याचप्रमाणे शेतीचे महत्व कळावे व लहान मुलांचे आनंद द्विगुणित करण्याकरता दरवर्षी बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा गावातच मंदिराच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी हा भरविला जातो .लहान मुले ,मुली,नवीन कपडे घालून व लाकडी नंदीबैल सजवून त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नंदीबैलांचे पूजन केले जाते. त्यानंतर नंदीबैलाचे परीक्षण करून उत्तम सजावट केलेल्या नंदी बैलांना प्रथम ,द्वितीय, तृतीय बक्षीस देण्यात येते .त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मुला मुलींना खाऊ, पेन ,पुस्तक ते वाटप केले जाते . त्यानंतर मुले मुली संबंधितांच्या घरी जाऊन मिळेल ते दान स्वीकारत असतात. अशाप्रकारे तान्हा पोळा उत्सव साजरा केल्या जातो. यावेळी गावातील सर्व महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येत असतात.



