

चिमूर – रोटरी क्लब चिमूर च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था सभागृह चिमूर येथे पार पडला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी चिमूर तालुक्यातील नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर मध्ये गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 20 सप्टेंबर 2025 शनिवार ला उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात रोटरीचे जनक पॉल हॅरिस व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब चिमूर अध्यक्ष विनोद भोयर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती विस्तार अधिकारी स्वप्नील खांडेकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून संजय पंधरे उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पालक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअर संबंधी मार्गदर्शन केले. जीवनात जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम असेल तर कुठलेही ध्येय साध्य करता येते. आपल्या ज्ञानाचा वापर समाज, देशासाठी कसा करता येईल यासह अनेक महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणातून त्यांनी मांडले.
शिष्यवृत्ती, नवोदय, दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच स्पर्धा परीक्षेकरिता मोफत प्रशिक्षण देणारे श्री आत्राम सर, श्रीरामे सर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे.पवन ताकसांडे,
सूत्रसंचालन कुशाब रोकडे तर आभार राजेंद्र संगमवार यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सचिव राकेश बघेल, कोषाध्यक्ष मंगेश हिंगणकर, माजी अध्यक्ष विशाल गंपावार, डॉ. महेश खानेकर, कैलास धनोरे, खुशाब रोकडे, राजेंद्र संगमवार, गुरुदास ठाकरे, अमर चट्टे, परेश दंदे, कृषिमित्र अभिजीत बेहते, श्रेयस लाखे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.



