

साकोली : शहरात काही बाहेरून आलेल्या अतिक्रमण धारकांनी चक्क महामार्गावरच सागवान वृक्षांची कत्तल केली होती. याबाबद “साकोली सोशल मिडीया” ने ०६ सप्टेंबरला “साकोलीत सागवन वृक्षाची कत्तल” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची तातडीने दखल साकोली वनविभागाने घेतली असून ( मंगळ. ०९ सप्टे.) ला वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग कार्यालय साकोली येथे त्या वृत्ताच्या आधारे सागवान वृक्षांना कापणा-या आरोपींचा शोध घेण्यासाठी चौकशी पत्र निघाल्याची माहिती वनविभाग कार्यालयात मिळाली.
सविस्तर की, दूरसंचार भवन समोर काही बाहेरून आलेले मुजोर अतिक्रमण धारकांनी खाजगी दूकानांची चाळ उभारतांना छताखाली अडथळा म्हणून शासकीय जागेवर असलेले अंदाजे १२ फूट उंचीचे चक्क मौल्यवान सागवान वृक्ष कापून काढले. येथे आता ते कापलेले झाड साडेचार फूट शिल्लक राहिले आहे. हा प्रकार ३१ ऑगस्टला साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद मेश्राम, इंजि. सपन कापगते, डी. जी. रंगारी, अनिल कापगते, महेश पोगळे, किशोर बावणे, गणेश बोरकर यांच्या लक्षात आला. तेथे उपस्थित जनतेनेही बोलले की, अश्या गब्बर व मुजोर अतिक्रमण धारकांना वनविभागाचे भय नाही का.? तर यांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून थेट वनविभागालाच आव्हान दिले की काय.! यावर “साकोली सोशल मिडीया” ने वृत्त प्रकाशित करताच दोन दिवसात या संतापजनक व गुन्हेगारी प्रकारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने एक्शन कारवाईची प्रक्रिया सुरू केली. ( मंगळवार ०९ सप्टें.) ला वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे, सहाय्यक वनसंरक्षक तथा अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संजय मेंढे यांच्या आदेशानुसार वनविभागाने चौकशी पत्र काढलेले आहे. व याची सखोल चौकशी करून ज्या हद्दीत व विभागाच्या कार्यक्षेत्रात हा गुन्हा घडला व ते आरोपी कोण याचा शोध घेतला जाईल. व तसे त्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाईल असे वनविभाग अधिकारी कार्यालय मधून माहिती प्राप्त झाली आहे.
खाजगी अतिक्रमणे उभारतांना कुठलीही परवानगी न घेता चक्क सागवान वृक्षांची कत्तल करणे या संतापजनक प्रकारावर साकोली वनविभाग एक्शन मोड मध्ये आलेले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार महाराष्ट्र शासन वन विभागाच्या लक्षात आणून दिला त्याबद्दल “साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटना” मधील जागृत सदस्यगणांचे आभार मानले आहे.



