

संजीव भांबोरे
भंडारा -तुमसर तालुका भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना तुमसरच्या वतीने सिहोरा येथे दोन दिवसीय भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १३ व १४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 13 सप्टेंबर 2025 ला सिहोरा येथील प्रथम नागरिक रंजना तुरकर यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा परिषद सदस्या सुषमा पारधी उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक तथा ब्ल्यू स्टार्म टीव्ही चॅनेल चे महाराष्ट्र प्रमुख संजीव भांबोरे, गणेश आतीलकर सरगम ग्रुप संचालक, श्रीकांत नागदेवे भंडारा जिल्हाध्यक्ष भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना, आर्यन नागदेवे, नंदलाल बनसोड, गणेश मेश्राम भारतीय लोक कलाकार संघटना तुमसर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सर्व महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्वागत गीत सादर करून सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ , शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमात अनेक कलावंतांनी आपली कला सादर केली असून या भारतीय लोककला संस्कृतीक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून एक व्यासपीठ त्यांच्या करिता तयार होते.व त्यातूनच जे खरे कलाकार आहेत त्यांना शासनाकडून मानधन उपलब्ध होते. या कार्यक्रमाकरिता मीनाक्षी पटले, उर्मिला पटले,सुनंदा नेवारे, ममता पटले ,दिंडेश्वरी शुक्ला, व मंडळातील सर्व कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.



