भंडारा जिल्हा पालकमंत्री पंकज भोयर यांची अड्याळ ग्रामपंचायतला भेट –सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी शाल ,पुष्पगुच्छ देऊन केला नागरी सत्कार

79

 

संजीव भांबोरे
भंडारा –आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर राज्यमंत्री गृह ग्रामीण, गृहनिर्माण ,शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म
महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री भंडारा, वर्धा जिल्हा यांनी ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथे भेट दिली असता ग्रामपंचायत सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी त्यांचा शब्दसुमनाने व पुष्पगुच्छ शाल,देऊन स्वागत केले . याप्रसंगी गावातील अनेक समस्येवर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले .यामध्ये ग्रामपंचायतला लागून असलेली जागा निस्तार हक्क कमी करून ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात यावे, बस स्थानकाचे व्यवस्था करून करून देण्यात यावी,घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती निशुल्क देण्यात यावी, ग्रामीण रुग्णालय येथील गैरसोयी दुरुस्त करून अद्यावत सोयी सुविधा करून देण्यात याव्या, गुजरी चौक येथील पानठेले हटविण्यात यावे , कासार बोडीगट क्रमांक १४४५ या ठिकाणी गावातील युवक तसेच नागरिकांसाठी क्रीडांगण तसेच गार्डन साठी उपलब्ध करून देण्यात यावे , अशा मागण्यांचे निवेदन, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आले .निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई मुंगाटे जिल्हा परिषद सदस्य, आसूजी गोंडाने जिल्हा अध्यक्ष भाजपा, तिलक वैद्य तालुका अध्यक्ष पवनी भाजपा, आशिक अंबादे ग्रामपंचायत सदस्य ,विकून टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य , यामिनी ताई निकोळे ग्रामपंचायत सदस्य वसुश्री टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य, मनोरमाताई मडावी ग्रामपंचायत सदस्य , नम्रता मडकवार ग्रामपंचायत सदस्य, ताराबाई कुंभारकर ,करिष्मा मोहनकर ,कल्पना साठवणे, रेखा कुंभलकर , उत्तम गाडेकर ,विकास टेंभुर्णे, नामदेव भुजाडे ,सुभाष कुबडी ,विठ्ठल बोरीकर ,चंदूभाई कोडापे, वसंत शिवरकर सजय फुलबांधे, शेखर दिघोरे, विजय डंभारे, जितेंद्र बोरीकर ,गणेश वंजारी ,पिंटू टेकाम, उमेश मानकर ,सचिन नंदनवार, किरण देशमुख ,भारत कराडे,स्वप्निल धुळसे, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.