अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे!

267

 

 

 

 

अशोक चव्हाण जे आता भाजपच्या तंबूत आहेत ते एकेकाळी कांग्रेस कडून महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री होते. त्यांनी महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री असतांना सैनिकांसाठी नियोजित आदर्श घरकुल मधून सासूबाईंना दोन फ्लॅट दिले होते. माय पॉवर. याच पाप कारणे भाजपने आक्षेप घेतला होता. तेंव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. गरीबाचे लेकरू. चूक झाली. चोरी केली. खरे तर चोरी करणे हा मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा घटनादत्त अधिकार आहेच. तर तो अधिकार बिचारा अशोक चव्हाण यांनी गाजवला तर बिघडले कुठे?पण भाजपचे प्रामाणिक नेते समजून घ्यायला तयारच नव्हते. अशोक चव्हाण यांनी खूप गयावया केली. बापा हो, तुम्ही सत्तेवर आलात कि तुम्ही पण चोरी करा. मी तुम्हाला सहकार्य करीन. तरीपण भाजप नेते हरिश्चंद्र राजाचे वंशज ऐकून घ्यायला तयार झालेच नाहीत. बिचारा अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला.महाराष्ट्र गेला उडत पण बिचारा अशोक चव्हाण ची पुढील कमाई बुडाली. अशोक चव्हाण यांनी शब्द दिला आणि पाळला. तेच आता भाजपच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आहेत. अरे! असा भ्रष्टाचार करणे हाच तर आपला मुख्य उद्देश आहे.

विलासराव देशमुख यांनी फक्त सिनेमा वाल्यांना राम गोपाल वर्मा यांना अतिरेकी हल्ल्याची पडछड दाखवली. म्हणे यावर सिनेमा बनवा. मला हिरो करा. बस्स इतकेच! त्यात काय विशेष? तरीपण त्यांचेवर हरिश्चंद्राचे वारस भाजप नेत्यांनी टिकेची झोड उठवली. बिचारा विलासराव देशमुख फक्त विलासी माणूस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन मोकळा झाला. खूप मोठा अन्याय झाला त्यांचेवर. विलास करणे पाप आहे का?

“खाया पिया कुछ नहीं. सिर्फ घर टुटा वो दिखाया. फिरभी पद छोडना पडा.बहुत नाइन्साफी हुई है.” तेंव्हा भाजपचे नेते प्रामाणिक होते.आता नाहीत.
बिचारा आर आर पाटील. तंबाखू शिवाय काहीच खाल्ले नाही. म्हणे
“बडे बडे शहरोमे छोटे छोटे हादसे होते है.”
एक छोटासा माणूस उंच पदावर पोहचले होते. ही जाणिव ठेवून ते असे छोटे छोटे शब्द वापरून बोलले.काय चुकले? मुंबईत हादसे तर पाचवीला पुजलेले आहेत. पण छोटासा हादसा, या छोट्याशा कारणावरून बिचारा गृहमंत्री अंगावरचे छोटे छोटे कपडे सहित छोट्या गावाकडे गेले.कारण भाजपचे नेते तेंव्हा प्रामाणिक होते. आता नाहीत.
आता हे अजित पवार मोठा दादा माणूस.दादागिरी तर स्वभावच आहे.सत्ता आणि संपत्ती हेच जिवनाचे अंतिम ध्येय आहे. त्यांना महाराष्ट्र, भारत, चंद्र आणि मंगळावर साखर कारखाने काढायचे आहेत. कुबेराशी स्पर्धा आहे. साखरेचे खाणार तो रेती माती मुरुम तरी का सोडणार?ते जळगाव ला आले तेंव्हा म्हणाले होते. मी कोणालाही सोडणार नाही. नाही सोडत ते कोणाला. तसा त्यांचा स्वभाव आहे. “पचास कोस दुरीपर जब कोई बच्चा सोता नहीं. तब मां बोलती है,बेटा सो जा. नहीं तो दादा आ जायेगा. ये देख दादाका चेहरा.”तब बच्चा सोता नहीं सुसाईड कर लेता है.

काय ती महिला. केरळ मधून महाराष्ट्रात नोकरी करायला आली. वाटले असेल. ” मै इमानदारीसे काम करूंगी,तो साहब इनाम देगा.”
येथे कसली ईमानदारी? हा महाराष्ट्र आहे.
यहां सब बेईमानीसे शासन प्रशासन चलता है. यहां वोटर लिस्ट में बेईमानी. यहां इव्हीएम मशीन में बेईमानी. यहां तो मतपेटी में बेईमानी. यहां काका के साथ बेइमानी. यहां आका के साथ बेईमानी. आप कौन सी ईमानदारी की बात सोचते हो. हमारा सी एम खुद बोलते है.कर्जमुक्ती करूंगा. किसको ईमानदार समझते हो? ईमानदार अफसर तुकाराम मु़ंडे को पुछो. यहां सत्ता और संपत्ती ऐठनेवालेको ईमानदार कहते हैं.

पार्टी की महिला कसं रही है.दादा की बात को बुरा मत मानना. उनकी आदत है. वो कुछ भी कर सकते. बोला ना,”मैं आपके उपर ऐक्शन लूंगा.”
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्व परीक्षा आहे. जी ईमानदारी अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, आर आर पाटील यांचा राजीनामा मागतांना दाखवली तिच ईमानदारी अजित पवारांचा राजीनामा घेऊन दाखवा. नाहीतरी, तुम्ही खरे भाजप आणि आरएसएस वाले नेते नाहीत. भेसळयुक्त भाजप चे नेते आहात. ज्यात कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेनाची भेसळ विरघळली आहे.

अजित पवार यांचा राजीनामा घेणे म्हणजे त्यांच्या वर अन्याय नाही.उलट तेरा कोटी लोकांना न्याय दिला जाईल. महिला अधिकाऱ्यांना न्याय दिला जाईल.

काल परवाच देवेंद्र फडणवीस यांनी गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतला असल्याचा फोटो पेपरात छापून आणला. गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज, आपण आमच्या फडणवीस महाराजांना सुबुद्धी द्यावी. सात रांजण भरले तर पापाचे परिमार्जन करण्याचा मार्ग दाखवावा.

 

 

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच, मो. ९२७०९६३१२२