“संघर्षातून घडलेले समाजप्रबोधनाचे दीपस्तंभ” …प्राचार्य राहूल डोंगरे… यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

46

 

दारिद्र्याच्या गर्तेत जन्म घेऊनहीआशेची ज्योत विझू न देता, ज्ञानाचा दिवा अखंड पेटवत ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राहूल डोंगरे सर.
खरबीच्या मातीत उमललेली ही फुलं, प्रेमलाल वडिलांच्या श्रमातून, अंजना आईच्या कष्टातून घडलेले हे रत्न!
उपाशीपोटीही शिकत राहिले, तुटपुंज्या साधनांवर मोठे झाले, पण मनातली उमेद कधी कमी झाली नाही.
दोन बहिणी आणि तीन भावंडांमध्ये वाढलेला हा मुलगा आज संपूर्ण समाजाचा दीपस्तंभ झाला आहे.
शिक्षक म्हणून – विद्यार्थ्यांचा खरा मार्गदर्शक.
🎙 वक्ता म्हणून – समाजाला विचारांनी हादरवणारा प्रबोधनकार.
✍ लेखक व पत्रकार म्हणून – लेखणीला सत्याचा शस्त्र मानणारा निर्भीड समाजसेवक.
कवी, गीतकार म्हणून – मनाला स्पर्शणारा भावविश्वाचा झरा.
त्यांच्या कार्याचा विस्तार केवळ शाळा-महाविद्यालयापुरता नाही.
बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जनतेत रुजविणारा तो खरा शिलेदार.
वृक्षारोपण, व्यायाम, प्राणायाम यांतून आरोग्याचा संदेश देणारा एक सजग नागरिक.
विज्ञान प्रयोगांतून शंका दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन जागविणारा प्रबोधनकार.
कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धावून जाणारा खरा समाजवीर!
शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे प्राचार्य म्हणून त्यांनी उत्तम अध्यापन, शिस्तबद्ध प्रशासन आणि सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यात ते एक दुवा ठरले आहेत.
त्यांच्या आयुष्यातील खरी ताकद म्हणजे त्यांचे कुटुंब. पत्नी सौ. सुगंधा यांच्या साथीनं, मुलगा प्रयास (डेव्हिड) आणि मुलगी अपेक्षा यांच्या संगोपनातून त्यांनी एक आदर्श घराणं घडवलं आहे. घराचा आधार घेत समाजासाठी वेळ, पैसा व बुद्धी अर्पण करणारे ते दुर्मीळ व्यक्तिमत्त्व आहेत.
आज प्राचार्य राहूल डोंगरे हे फक्त तुमसर नगरीचे नाहीत तर संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे अभिमान आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिलं की जाणवतं – संघर्ष म्हणजे अडथळा नाही, तर यशाकडे नेणारा मार्ग आहे!
.. अशा तेजस्वी, कर्तबगार, सज्जन, शीलवान प्राचार्य राहूल डोंगरे सरांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आमच्या मंगलमय शुभेच्छा ..
दीर्घायुष्य लाभो!
विचारांचा दीप प्रज्वलित राहो!
प्रेरणेचा झरा अखंड वाहो!

*संकलन विशेष लेख*
*पत्रकार संजीव भांबोरे सामाजिक कार्यकर्ता भंडारा 7066370489*