राजकारण, समाजकार्याची दिशा व सामान्य माणसांची कोंडी

132

 

 

पुरोगामी महाराष्ट्रात महामानवाच्या विचारांचा गाजर होतोय कि गजर हा चिंतनाचा विषय आहे. आजच्या घडीला देशाचं तर सोडा, सध्यां महाराष्ट्राच राजकारण अतिशय क्लिष्ट आहे. सामान्य माणसाला राजकारण नको वाटायला लागलं, नैराश्य, उदासिनता आणि राजकारण्यांविषयी प्रचंड राग अनुभवायला येतं .
याचे तसे भरपूर उदाहरण देता येईल.
निवडणूकांपूर्वि योजनांचा पाऊस पाडला जातो. एकदा का संपलं कि जैसे थे …

साधा नगरसेवक ही निवडून आल्यानंतर गडगंज पैसा कमावतो, त्याला वाटते कि मी जो निवडणूकीवर पैसा खर्च केला तो खर्च भरून काढायचा. ही मानसिकता घेऊन जो राजकारणाच्या पटलावर ती खेळ मांडू पाहत असेल तर तो तुम्हमच्या आम्हच्या विकासासाठी काय झटणारं?

पक्षांतर्गत कलहामुळे प्रत्येक पक्षात स्वतः च्या फायद्यासाठी साटेलोटे होत असताना आपल्याला अनुभवायला येतं. जे विचारधारा माणणारे पक्ष आहेत त्यांची वाताहत करण्यात कुठलीच कसर कमी पडत नाही.
राजकारण राजकारणासारखे न करता स्व हीत व माझी पोळी भाजली म्हणजे झालं, यासाठी समोरचा कितीही निष्ठावान असला तरी पक्षातील वरिष्ठांना जे दाखवलं जातं तेच खरं कारण एवढा वेळ कुणाकडे असतो, कुणि पदाचा गैरवापर करतो, तर कुणी पक्षाला नेस्तनाबूत करण्यात मश्गूल असतो.पण जो ग्राऊडलेवलवर काम करतो त्याच्या वाट्याला काय येतो तर ….
पैसा असल्याशिवाय निवडणूक लढवताच येत नाही ही भावना बहूतेकाच्या मनात रूजलेली असते म्हणून निवडणूकीपासून लांब राहीलेले बरे हा विचार मनात खोलवर रुतलेला असतो. हे जर चित्र बदलायचे असेल मतदात्याने जागरुक असले पाहिजे. जेणेकरून असा उमेदवार निवडून दिला पाहिजे जो भविष्यात येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल …

हो आणि हे होऊ शकते जर तुम्ही आम्ही ठरवलो तर..असे कितीतरी सज्ञान, निष्ठावान आणि प्रामाणिक काम करणारे आहेत, जे या परिस्थितीला सामोरे जाऊन समाजाचं कायापालट करु शकतात त्यांना आम्ही तुम्ही बळ देण्याची गरज आहे.
बाबासाहेबांनी म्हटलं होतं जा आणि *आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे*

जो जो संघर्ष बाबासाहेबांच्या वाट्याला आला तो विदारक होता. प्रत्येक गोष्टी साठी लढावं लागलं आणि आज आपल्याला सर्व आयतं मिळालं, तेही जपून ठेवण्यात कमी पडत आहोत कि काय हा मोठा विचाराधीन प्रश्न आहे.
राजकारणात फार मोठा अपयश पत्करुन का म्हटले असतील बाबासाहेब?
का त्यांना वाटलं असेल आपण हा संदेश द्यावा. अत्यंत दूरदृष्टी चा विचार करणारे बाबासाहेब सर्वात आधी लोकांचा, देशाचा विचार करायचे , सर्वसामान्य माणूस सत्तेत असेल तर तो सर्वसामान्यांसाठी , त्यांच्या हक्कांसाठी लढू शकतो, त्याला जाणीव असेल.
ज्या मातीशी त्याची नाळ बांधलेली आहे ती नाळ घट्ट करण्याची जवाबदारी त्याच्यावर असेल.
तुम्हच्या हातात सत्ता असल्याशिवाय तुम्ही तुमच्या समाजाचे संरक्षण करु शकणार नाही. ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट इथे सांगाविशी वाटते.
आपण खुप सैरभैर झालेले वादळात अडकलेले आहोत आणि इथून बाहेर निघण्याचा मार्ग ही आपल्याकडेच आहे. ते ज्याला त्याला ठरवावं लागेल दिशाहीन झालेली वाट दिशेला जायला हवी यासाठी सकारात्मक विचार करावं लागेल …..
आणि येणा-या पिढ्यानपिढ्या गारद होऊ नये म्हणून महामानवाच्या विचारांचा देश घडविण्यात आपली भूमिका महत्त्वाची असली पाहिजे. याची जाणीव झाली तर बदल निश्चितच होईल.
कोणतीही गोष्ट चिरंतन काळ स्थिर नसते, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे हे समजून घेण्याची गरज आहे.

 

*सुनिता टेंभूर्णे, तुमसर , भंडारा मो. 94055 11177*