जवान हो या किडे मकोडे?रेंगनेवाले!

88

 

 

 

जनतेला जे खटकते ते बोलण्याचे धाडस कोणी करीत नाही. मला वाटते जे जे चुकीचे ते बोलले पाहिजे.
कोणी उच्च पदावर असला म्हणून त्याला चुकीचे काम करायची मुभा असते का? तसे असेल तर कसली संविधानिक समानता? कसला न्याय?ही तर दिशाभूल आहे. आम्ही संविधान मानायचे आणि काही लोकांनी पदाचा, पगाराचा, अधिकाराचा टेंभा मिरवायचा? तो मालक आणि आम्ही गुलाम? यात कसली समानता? उलट जो उच्च पदावर असतो, जास्त पगार घेतो, जास्त सुविधा घेतो तो जास्त जबाबदारीने वागला पाहिजे. तरच मी त्याला मान सन्मान देईन. राजा रस्त्यावर हागत असेल तर प्रजेने दगड मारलाच पाहिजे. नाहीतर तो काहीही करीत राहिल. आणि प्रजा नाकाला रुमाल लावून रडत कुडत राहिल. छे! ही लोकशाही नाही. ही न्यायव्यवस्था नाही. ही लांडगा कोल्हाची ढोंगशाही आहे.
आज रोजी आपल्या आमदार, खासदार, मंत्री कडे जास्त संपत्ती आली कोठून? ही माझ्या तुमच्या ताटातून चोरलेली आहे. इतिहास काय चगळता! जरा वर्तमान तर तपासून पहा. तरूणांना हे कळले पाहिजे. किमान जे नोकरी साठी हवालदिल होऊन वण वण भटकत आहेत. जे काम नाही म्हणून कुवारे फिरत आहेत.
तरूणांना नोकरी नाही. म्हणून लग्न होतं नाही. आणि दुसरीकडे आमदार खासदार मंत्रीच्या अनेक बायका. एकानंतर दुसरे लफडे. दुसरीनंतर तिसरे लफडे. तरीही ते मंत्री म्हणून सरकार चालवत आहेत. फडणवीस महाराज, मोदी महाराज यांना या लफड्यांची दुर्गंधी येत नाही. लफडेबाज मंत्र्यांची चीड येत नाही.
मोदी आणि फडणवीस यांच्या दृष्टीने राम फक्त बहाणा आहे. यांच्या वागण्यात कुठेही राम नाही.
महाराष्ट्र राज्यातील २८८ आमदारांकडील संपत्ती मोजली पाहिजे. हे तर जनसेवक आहेत. तर मग इतका पैसा आला कोठून? कांदा विकला कि लसूण? आंबा विकला कि केळे? अहो! हा तर चोरीचा माल आहे. हे आमदार इंग्लंड अमेरिका मधे चोरी करायला गेले नव्हते. त्यांनी येथेच आमच्या ताटात हात मारला आहे.

आता शाळा कॉलेज विद्यापिठात असा विषय सिल्याबसला शिकवला गेला पाहिजे. आमदारांनी, मंत्र्यांनी ही संपत्ती चोरलीच कशी? कुठे किती जास्त एस्टीमेट बनवले? मंजूरीसाठी किती पैसे घेतले? नंतर किती टक्के कमीशन घेतले? या चोरांना कोणती सजा दिली पाहिजे? याचा सखोल अभ्यास आता तरुणांना दिला पाहिजे. नाहीतर तरुण जन गण मन म्हणत राहातील आणि हे चोर तन मन धन चोरत राहातील. आता एक लोटा जल नका सांगू. आमच्या ताटातील वाटा चोरला कोणी? ते सांगा.

जर तरूणांना कळले कि, हेच ते चोर! अंधभक्तांना देशभक्ती शिकवतात. आणि ते बेधुंद होऊन बुंदी खातात. तेंव्हा या तरूणांची टाळकी फिरेलच. वंचित तरूण. पिडित तरूण. भुकेला तरूण. बेकार तरूण. बेरोजगार तरूण. एकदाचा बेफाम झाला कि तुफान आल्याशिवाय राहाणार नाही.
म्हणून राजकीय चोरांना अजूनही संधी आहे. चोरलेला पैसा सरकारी तिजोरीत परत करायची. या संधीचा फायदा घ्या. नाहीतर तरूणांची टाळकी फिरली कि मंत्री डबोले टाकून अफगणिस्तानात पर्यंत थांबणार नाहीत.
तरूणांनो आता भजन, किर्तन, प्रवचन ऐकणे बंद करा. स्वर्गातील जिवनाचे सुख नंतर पाहू. आता पृथ्वीवरील जिवनाची चिंता करा. आता अभ्यास करा. आता चर्चा करा. आता निश्चित करा. आपला वाटा चोरला कोणी? पांच वर्षात मंत्री कडे दोन हजार कोटीची संपत्ती आली कशी? मी कंगाल कसा काय?मी बेकार कसा काय?मी कुवारा कसा काय?
क्रांतीवीर सिनेमात एक बदमाष एका बाईला छेडतो. पोरगं पळत येतं हिरोकडे. म्हणे अंकल, माझ्या आईला वाचवा.
अंकल म्हणतो, उचल दगड. जसा इलेक्ट्रीकचा लाईट फोडतो ना! तसेच त्याचे टाळके फोड. तुझा इलाज तुलाच करायचा आहे. तुझे संरक्षण तुलाच करायचे आहे!
असे सांगणारा क्रांतीवीर असतो. तो म्हणतो,
आओ. मेरी मौतका तमाशा देखने. उपरसे फंदा आयेगा. मेरी गर्दन लटकायी जायेगी. मै लटक जाऊंगा. जबान बाहर आयेगी. तुम टाली बजाओगे. घर चले जाओगो. कहोगे, कलका तमाशा अच्छा था!
उपरवाला तुम्हे देखकर समजता होगा. मैने तो इन्सान पैदा किये थे. ये तो किडे मकोडे निकले.रेंगते हुए जीनेवाले. मरे कितने और जीये कितने? कोई हिसाब नही!

 

 

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो. ९२७०९६३१२२