

आपल्या देशामध्ये अनेक पौराणिक आणि मिथक (दंतकथा) लिहिल्या गेल्या आहेत. त्यांच्या आधारित पारंपारिक पद्धतीने विविध जाती धर्मात उत्सव साजरे केले जातात. घटस्थापनेच्या दिवशी सर्व शस्त्रे स्वच्छ करून पुजली जातात. तसेच बळीराजा (शेतकरी)आपल्या घरांतील धान्याची उगविण्याची क्षमता पहाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचीं बी बियाणे पुजलेल्या घटाशेजारी उगवायला ठेवून त्या बी उगविण्याची तपासणी करीत असतो. वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा हा हिंदू कॅलेंडर चा सातवा महिना असलेल्या अश्विनी महिन्याच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. ज्यामध्ये पौर्णिमा दिसते या घटनेला “तेजस्वी, पंधरवडा (शुक्लपक्ष) म्हणतात.
पौराणिक कथेनुसार हा सण दुर्गेच्या म्हशीच्या राक्षस महिषासुरावर विजयाचे प्रतिनिधित्व करतो. जिथे देवीने त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले आणि शेवटी दहाव्या दिवशी विजयादशमी नावाचा विजय मिळविला होता. त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली होती. “नवरात्र” पौराणिक कथेनुसार नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रुपाची पुजा करतात. माँ.शेलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माॅ चंद्र घंटा, माॅ स्कंद माता, माॅ कात्यायनी, माॅ कालरात्री,माॅ महागौरी, माॅ सिद्धिदात्री यांचा समावेश होतो.
काही भागात दसऱ्याच्या सिमोलंघन दिवशी रावणाचा पुतळा जाळून विजयाचे प्रतीक म्हणून तो दिवस साजरा केला जातो.
मनुवादी विचारांच्या व्यवस्थेने पौराणिक कथेच्या माध्यमातून बहुजनांना वर्ण व्यवस्थेच्या आणि अंधश्रद्धा अज्ञानाच्या पिंजऱ्यात कैद करून मानसिक गुलाम करून मानसिकदृष्ट्या अपंग बनविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता. आज देखील आहे. स्त्रीयांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य दिले जात नव्हते. षुरुष प्रधान संस्कृती नुसार स्त्रियांना पायाच्या नखापासू डोकीच्या केसापर्यंत सामाजिक बंधनात बंदिस्त करून ठेवले जात होते. या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक समाज सुधारक आणि विचारवंत महिलांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करून मनुवादी व्यवस्थेच्या बंधनातून मुक्त केले. आणि शिक्षण स्वातंत्र्य, समता, समानता, हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी प्रत्यक्षात अनिष्ट प्रथेच्या विरोधात अहोरात्र ज्या महिलांनी प्रयत्न केले आहेत. त्या कर्तव्यदक्ष महिलांच्या कार्याचा आणि विचारांचा नऊ रात्री महिला मेळाव्यातून जागर होणे. एकविसाव्या शतकात काळाची गरज आहे. उदा.राज्य माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, शिक्षण क्षेत्रातील सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई,कित्तूर चन्नम्मा,माता भीमाई,माता रमाई.इत्यादी अनेक महिलांनी प्राणांची आहुती दिलेली आहे.त्यानी केलेल्या त्यागाची जाणीव करून आजच्या पिढीला दिली पाहिजे.
या देशात प्रथम महिलांना स्वातंत्र्य मिळून दिले ते करुणा शील गौतम बुद्धांनी पाचशे महिलांना भिकू संघांत उपासिका बनण्याची संधी दिली. त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षण देवून सुशिक्षित करून पहिल्यांदा पुण्यात महिल़ांच्या साठी पहिली शाळा सुरू केली. शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांची पहिली शिक्षिका म्हणून निवड केली आणि मुलींच्या शिक्षणाचा पाया रचला.
त्या नंतर महिलांना आणि बहुजन समाजाला जाती धर्मांच्या, कर्मकांडाच्या, अज्ञानाच्या अंधकारात कोंडून ठेवले होते. या बंधनातून एक रक्ताचा थेंब न सांडता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या चौकटीतून देशातील सर्व महिलांना स्वातंत्र्य समता बंधुता समानता हक्क आणि अधिकार मिळवून दिला गेला म्हणून आज महिलांनी सर्व क्षेत्रात यशस्वीपणे यशाचं शिखर गाठले आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुरषापेक्षा अधिक प्रगती करुन दाखविलेली आहे.हे कोणाला ही नाकारता येत नाही.अनेक भागात प्रामुख्याने प्रत्येक देवीला नऊ दिवस तेल जाळण्याच्या प्रथा दिसून येताहेत. शारीरिक श्रमातून झालेली झीज भरून काढण्यासाठी तेलाची अंत्यंत गरज आहे.कांही सामान्य माणसाला एक वेळेस आमटीला आणि भाजीला फोडणी देण्यासाठी तेल मिळत नाही.अशी परिस्थितीची वस्तू स्थिती असताना भोळी भाबडी जनता श्रद्धेच्या पोटी निर्जीव वस्तूंवर तेलाचा,तुपाचा,दुधाचा,दह्याचे नाव्हान घालत असल्याचे दिसून येतात. दुसरीकडे बिन अन्न पाण्याविना माणसं तडफडून मृत्यू पडतात. रात्रंदिवस जगण्यासाठी रक्ताचे पाणी करून धडपडत आहेत. या देशातील सर्व दैवत उघड्या डोळ्यांनी पाहत असतात.पण मदतीला कोणी धावून आलेला नाही. आपल्या देशात बहुसंख्य जनता गरिबीच्या विळख्यात सापडून त्यांना जिवंतपणीच मरणाच्या यातना भोगत त्यांना जगावं का मरावं हा प्रश्न भेडसावत आहे.
गरबा (दांडीया) हा खेळ प्रामुख्याने गुजरातमध्ये खेळला जात होता. अलिकडे यांचे प्रमाण हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले दिसून येते. यामुळे राष्ट्रीय थोर समाज सुधारकांनी केलेल्या त्यागाची, आणि सामाजिक बांधिलकी स्विकारुन. केलेल्या कार्याची ओळख हळूहळू पडत चालली आहे.तरुण पिढीच्या हाताला कामधंदा नसल्याने बेकारी वाढत जावून.साधू संतांचे विचारांना बाजूला सारून गोकुळाष्टमी, गणपती,दुर्गा देवीच्या कार्यक्रमांत बहुजनांची तरुण पिढीला गुंतविले जात असल्याचे दिसून येत आहे.पुढच्या पिढीच्या दुर दृष्टीने विचार केला तर राष्ट्रीय थोर समाज सुधारकांच्या कार्याला तिलांजली देऊन मनुवादी व्यवस्थेच्या विचारांना चालना देण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची दाट शक्यता वाढते.
“पर्यावरण”……पर्यावरणाच्या रक्षणासाठी फक्त आम्ही मोठं मोठ्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आपण समाधान मानतो आहे.पण प्रत्यक्षात कृती मात्र शुन्य.जंगल असलेल्या भागात प्रामुख्याने सोनं म्हणून आपट्याच्या झाडाची पाने तोडून वाटली जातात.ज्या भागात जंगल नाही त्या भागात कोणत्याही झाडांची पाने फांद्या तोडून सोनं म्हणून वाटण्याच्या प्रथा सर्वत्र दिसून येतातअनेक वृक्षांची पाने आणि फांद्या तोडून ती झाडं बोडकी केली जातात.त्या झाडांना वेदना होऊन आपल्या नावाने ढसा ढसा रडत असतात.झाडांची पानं वारा किंवा हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे महान कार्य वारा करीत असतात.सजीव प्राण्यांनी प्राणवायू शोषून घेऊन सोडलेला कार्बन डायॉक्साईड वायू शोषून घेतात.आणि पुन्हा प्राणवायूचा पुरवठा करण्याचे महान कार्य करीत असतात.समजा निसर्गातील प्राणवायू संपला तर देशातील ३३ कोटी देव प्राणवायूची सिलिंडर भरुन प्रत्येकाला घरपोच पार्सल पाठवणार आहेत का?.
तसेच वृक्षांच्या वाढीसाठी लागणारं अन्न पाणी शोषून पानचं घेत असतात. ऊन्हाळ्यामध्ये वृक्ष स्वतः सुर्य प्रकाशाची ऊष्णता सहन करत सजीव पशू ,पक्षी,मानव जातीला सावली देत असतात.त्याच प्रमाणे अवकाशातील पाऊसाचे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे कार्य झाडांची पाने करत असतात. आकाशातील पावसाच्या धारा भू मातेला न्हाऊ घालण्याचे कार्य पानांचं करतात ना!मग का त्यांची पाने, फांद्या तोडून त्यांना वेदना देण्यात आपण धन्यता मानत आहात का ॽ
सोनं घ्या सोन्यासारख्या रहा हा संदेश देत असतो.कधी आपण माणसाशी माणूस म्हणून माणसा सारखं वागतो आहे का? आपण जर माणसा बरोबर माणसासारखा वागलो असतो तर!दिवसा ढवळ्या माणसांचे मुडदे आणि खूण,दरोडे,अत्याचार, भ्रष्टाचार, स्वैराचार आपल्या देशात घडले असते का? विज्ञान युगात माणूस म्हणून आत्मपरिक्षण करण्याची खरी गरज आहे.झाडांची पानं तोडण्या पेक्षा माणसाने सर्व जाती धर्माच्या माणसाच्या गळ्यात गळा घालून सोन्याच्या विचारा प्रमाणे वागायला शिकाल !तरच देशात शांतता नांदेल.आणि सर्व जाती धर्माची माणसं आनंदाने गुण्यागोविंदाने नांदू लागतील.आणि कोर्टकचेरी वरील,पोलिस खात्या वरील ताण कमी होईल! “मुहमे राम और बघलमे सुरी” सध्या ही प्रवृत्ती वाढीस लागलेली सर्वत्र दिसून येते. जातीधर्माच्या नावावर देश पेटविला जात असल्याने देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होतो आहे.मुस्लिम बांधवांच्या उत्सवात सर्व धर्मियांचे लोक सामील होऊन त्याचा लाभ घेत असतात.आणि आपल्या उत्सवात त्यांना प्रवेश बंदी कारण काय ते भारतीय बांधव नाहीत का? फक्त निवडणूकीच्या वेळी मतांच्या साठी चालतात का?. येथे सर्व धर्म समभाव नाही का?.
निसर्गातील हवा,पाणी,जमीन,सुर्य प्रकाश,चंद्राचं चांदणं,अन्न सर्वांना सारखं आहे.मग माणसा,माणसात भेदभाव कशासाठी?.या पृथ्वीतलावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या त्या वेळी कोणत्याही तपस्वी नी किंवा दैविक शक्तीं मदतीसाठी धावून आलेली नाही.तर संकटाच्या वेळी इंजिनियर,डॉक्टर,तंत्रज्ञान,टेक्नॉलॉजी, शास्त्रज्ञांनी,सर्व सैनीक दलातील जवानांनी,पोलीस दल,अनेक यंत्रनानी जिवांची बाजी लावून मदत केलेली आहे.
आजकाल नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसायला पाहिजे.असे कोणत्याही धर्म ग्रंथात सांगितलेले नाही.चार वेद,उपवेद, पुराणे,रामायण,महाभारत,दुर्गा सप्तशक्ती,दुर्गा देवी ग्रंथ,साठ स्मृती ग्रंथ,या सगळ्यांचा अभ्यास केला तर असे कुठेच लिहिलेले नाही. धर्माच्या नावाखाली कांहिही खपवले जात आहे.नवरात्रमध्ये नऊ दिवस घाला द्रुतवस्त्र म्हणजे धुतलेले कपडे.नऊवारी साडी परिधान केला तर अती चांगले.हे सर्व व्यापाऱ्यांनी चालवलेला ट्रेड आहे.
नऊ दिवसांचे कडक उपवास केला.पण कधीच देव भेटलाचं नाही.माझ्या कष्टकरी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधी ढळले नाही.फाटक्या संसाराची ठिगळ जोडता, जोडता केस कधी पांढरे झाले कळलेच नाही.आयुष्यातील दुखःची वादळ झेलत ती कुणापुढे लाचार होऊन झुकली नाहीत.ज्यानी आम्हाला जन्म दिला आमच्यावर चांगले संस्कार केले.आमच्या आयुष्यात सुंदर रंग अशा माझ्या जन्म दात्यांना कोटी कोटी प्रणाम.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या शिलेदारांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.महान युग पुरुषांची आणि राष्ट्रीय समाज सुधारकांची नावे फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच केलेली नाटकं असतात का? त्यांचा आदर्श आणि विचार नको आहेत का?.माणूस जन्माला येताना सर्वजण आईच्या गर्भाशयामधून नऊ महिण्यानेचं जन्माला येतात.शेवटच्या क्षणी जाळल्या नंतर सर्वांची राख एक सारखीच असते.कोणतेही उत्सव साजरे करत असताना त्यामागील उद्देश किंवा सत्यता पडताळून पाहण्यासाठी कोणीही प्रयत्न करत असल्याचे दिसून येत नाहीत.
उत्सवाच्या वेळी प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रुढी रिवाजानुसार साजरा केल्या जाताहेत.कोणत्याही उत्सव साजरा करत असताना विज्ञान युगात कालबाह्य झालेल्या अनेक रूढी परंपरांचा विचार केला जात नाही.एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे विचारांची देवाणघेवाण करतांना वैचारिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा केली जात नाही. जसे आहेत तसेच विचार स्विकारण्याची माणसांची मानसिकता तयार झालेली दिसून येते.जे सत्य आहे ते नेहमी लपविण्यासाठी प्रयत्न केले जातात.आणि असत्य आहे.ते सत्य म्हणून बिंबविण्यासाठी मनुवादी विचारांच्या व्यवस्था सात त्याने प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
माणूस जिथे स्वतः चि वैयक्तिक स्वार्थ आहे.तेथेच फक्त स्वतःच्या शरिरावर स्वतःचं डोकं ठेवून विचार करत असतो.इतर ठिकाणी मात्र शरीर स्वतः चं डोकं मात्र दुसऱ्याचं वापरत असतो.ज्या वेळी खरोखर पुस्तकांच्या विचारातून मस्तक घडतं ते कुठेही सहजासहजी झुकत नसतं.
विज्ञान,तंत्रज्ञान,टेक्नॉलॉजी,कृषी प्रधान देशात उत्सव साजरे करताना विवेकवादी, विज्ञानवादी,तर्कशुद्ध परिवर्तनवादी बणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तो केला जात नसल्याचे.वेळोवेळी दिसून येते.कोणतेही उत्सव साजरे करतांना जातीय तेढ निर्माण करण्या ऐवजी एकमेकांचा आदर करुन त्यातील आनंद घ्यावा.शस्त्राने एकाद्याची हत्या घडवून आणली जाऊ शकते.तर लेखणीने समाजाचे प्रबोधन करुन परिवर्तन घडवून आणले जावू शकते.
देशमुख पी.आर.
मो. ९९२११११९५५



